पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र भाग ४ इकडेहि आपल्याला माहित नाही असे नाही. स्वदेशी चळवळ सुरू झाली ती फाळणीच्या चळवळीत. ती टिळकानी मूळ उत्पन्न केली नाही. फाळणी केलेल्या बंगालच्या लोकांच्या भावना काय असतील त्या तुम्हा आम्हाला येथे काय कळणार? डार्लिंग –पण स्वदेशी ही स्वराज्य मिळविण्याची एक पायरी असे टिळक म्हणत असल्याचा पुष्कळ पुरावा पुढे आला आहे. स्वराज्य म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य आणि ते मिळविण्याच्या प्रयत्नात जर्मन व फ्रेंच माल लोकानी घेतला तरी चालेल पण इंग्रजांचा घेऊ नये असे टिळकानी लोकाना सांगितले? ८० सायमन–ते असेल. पण स्वदेशी ही फाळणीच्या गोष्टीतून निघाली एवढेच मी सांगितले. ही फाळणी अखेर बादशाहांना रद्द करावी लागली. स्वदेशीचे लेख हे ह्या फाळणीच्या काळातीलच आहेत हे लक्षात ठेवा. स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य असे नाही तर साम्राज्यातील स्वराज्य ही गोष्ट पुढे आलेली आहे. लेखात व टिळ. कांच्या जवानीतहि आहे. कोणत्याहि ठिकाणी मोठ्या चळवळीतून लहान सहान अत्याचार असे होतातच, की त्यांचा अर्थाअर्थी त्या चळवळीशी काही संबंध दाख- विता येत नाही आणि नसतोहि आजच युरोपात काय झाले आहे पहा! शांतता प्रस्थापित करण्याकरिता म्हणून लोक जमले व त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. समजा याला उद्देशून एखाद्या फ्रेंच वर्तमानपत्राने असे लिहिले की ही 'गोष्ट होणार हे ठरलेलेच होते. तुम्ही लोकावर हल्ले केले तर लोक सूड घेतल्या- शिवाय कसे राहतील?' तर तुम्ही त्या दंग्यावद्दल त्या वर्तमानपत्राला जवाब- दार धराल काय? याहून अधिक निकटसंबंध येतो असे म्हणावयाचे असेल तर तो शाबीतच करावा लागेल. यानंतर आपण ताई महाराजांच्या खटल्याचा मुद्दा घेऊ. चिरोल साहेबानी सांगितले आहे की आपण हिंदुस्थानातील असंतोषाचे भर्म हुडकून काढण्याकरिता गेला. अर्थात रँड साहेबांचा खून इत्यादिकासारख्या गोष्टी त्या पुस्तकात आल्या तर ते एक असो. पण टिळकानी आपल्या ताब्या- तील एका स्त्रीला फसविले आणि सामान्य प्रामाणिकपणाहि दाखविला नाही असल्या व्यक्तिविषयक गोष्टींचा उल्लेख अशा मोठ्या पुस्तकात यावा काय? उद्या आयर्लंडातील अशांततेची मीमांसा करण्याकरिता कोणी गेला आणि एखाद्या आयरिश गृहस्थाच्या खाजगी गोष्टीचे उणे त्याने काढले, स्थूल राज- कारण सोडून एखाद्या व्यक्तीला अप्रामाणिक म्हटले, तर ते कसे दिसेल? ताईमहाराज खटल्यासंबंधाने लिहिताना सर्व कच्ची हकीकत न देता चिरोल साहेबानी चंदावरकरांच्या निकालाचा उल्लेख केला आहे. पण नुसत्या न्यायाधी- शाच्या निकालात खटल्याची सर्व हकीकत येऊ शकत नाही. म्हणून खटल्याची हकीकत देताना जर चूक झाली तर त्या चुकीचे समर्थन करण्याकरिता न्यायमूर्तीच्या निकालाकडे बोट दाखविता येत नाही असे हाऊस ऑफ लॉर्डसने इकडेहि ठरविले आहे. टिळकांच्या जागी तुम्ही असता तर तशा परिस्थितीत त्यांनी आपले वजन खर्च केले तसे करावे लागते की नाही हे कळून आले