पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ सर जॉन सायमन यांचा समारोप ७९ म्हणून. टिळकानी स्वतः आखाडे काढले नव्हते. व त्याना मदत केली ती वाईट हेतूने केली यासंबंधी प्रत्यक्ष पुरावा आलेला नाही. इकडे चिरोल साहेब टिळकाना मोठे बुद्धिवान म्हणतात. आणि त्यांच्यावरच पोरांच्या आधारावर इंग्रजी राज्य उलथून पाडण्याच्या प्रयत्नांचा ते आरोप करितात ही गोष्ट किती भलेपणाची आहे? चिरोल साहेबासारख्या चिकित्सकाला असली गोष्ट पटावी हे आश्चर्य आहे. पैल- वान तालीमबाज हे लोक हिंदुस्थानातील समाजाचे एक प्रकारचे कायमचे अंगच होते. त्यातूनहि नातूनी टिळकावर ग्रामण्य केले ही गोष्ट शात्रित असता त्यांच्या मदतीने टिळकानी आखाडे वगैरे काढले असे चिरोल साहेब म्हणतात! एका सभेचे अध्यक्ष नातु होते व तेथे टिळकानी ठराव मांडला एवढ्यावरून त्यांचा संबंध कितीसा असू शकतो? आता तिसरा मुद्दा घेऊ. काय म्हणे टिळ- कानी कोरडे ओढून चळवळीला पैसे काढले! टिळकांचे काही लेख वाईट असतील. मी म्हणतो एखाद्या चांगल्या वकीलानेहि त्याचे समर्थन करण्यास उभे राहू नये असेहि असतील. पण म्हणून त्यामुळे चिरोल साहेबाना त्यांच्या संबंधाने इतर काय वाटेल ते आणि वाटेल तितके लिहिण्याला मोफत सनद मिळाली असे होते की काय? 'कोरडे' हा शब्द जरी अक्षरशः घ्यावयाचा नाही तरी ह्या शब्दातून निघणारा ध्वनि बेअब्रूकारक आहे. पार्लमेंटात कोणी फ्रोट्रेडर असतो. कोणी टॅरिफ रिफॉर्मर असतो. जो तो आपले मत मांडताना दुसऱ्यावर काय कमी कोरडे ओढतो? म्हणून ते आपल्या पक्षाकरिता या कोरड्याच्या मदतीने जवरीखाली वर्गण्या गोळा करितात असे म्हणता येईल काय? एखाद्या वाईट माणसानेहि बेअब्रूची फिर्याद केली तरी तिचे समर्थन करण्याला उभे राहिल्यावर तो असा तसा वाईट आहे असे नुसते म्हणून भागत नाही. तर तुम्ही जे शब्द बोलता ते शब्द शाबीत करावे लागतात. स्वदेशीचे व्रत व ते न पाळल्याबद्दल होणारी शिक्षा असल्या गोष्टी मोठ्या वाईट व अद्भुत आहेत असे तुम्हाला वाटेल. पण अशा गोष्टी आपापल्या परीने प्रत्येक देशात असतातच. चुडेमंगळसूत्र हेहि स्वदेशी असावे नाहीतर लग्नाचे परिणाम अशुभ होतील असे केसरीत कोणी लिहिले ते मात्र दूषणाई! पण तुमच्या ह्या देशात कितीतरी अशा स्त्रिया आढळतात की मे महिन्यात अगर शुक्रवारी लग्नविधि करणे हे त्याना अशुभकारक वाटते? आयल- डात स्वदेशी वस्त्र न वापरता लग्न लागले तर चायकाना जन्मभर वाइट वाटते की नाही? तात्पर्य ह्या ज्याच्या त्याच्या भावनेच्या गोष्टी आहेत. त्याला अद्भुत म्हणून दुसऱ्याने नावे ठेऊन काय उपयोग? बरे टिळकानी हे सर्व केले ते स्वदे- शाचे हित व्हावे अशाच हेतूने की नाही? बंगालची चळवळ घेतली तरी काय दिसते? तिच्यात कोणकोणत्या गोष्टी घडल्या हे अगदी कार्सन साहेबानी समजावून सांगितले. आणि फिरून म्हणण्याला ते तयारच की फाळणी म्हणजे येऊन जाऊन काय? एका प्रांताचे राज्यव्यवस्थेकरिता दोन भाग केले इतकेच! पण एका राष्ट्राची दोन राष्ट्रे करणे ही किती दुःखाची व रागाची गोष्ट असते हे