पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र ० भाग ४ घडल्याबद्दल लिहिले आहे ह्या सर्व खऱ्या असतील असे ते कधीहि म्हण- णार नाहीत. दिवस अकरावा - (२१ फेब्रुअरी १९१९) 66 आज बहुधा हा खटला संपावा अशा वेतानेच मी माझे भाषण आवरते घेणार आहे. ह्या खटल्याच्या चतु: सीमेबाहेर अनेक गोष्टी आम्हाला महत्त्वाच्या अशा असतील आणि आपले साम्राज्य टिकावे अशीहि तुम्हा आम्हाला काळजी वाटत असेल. तथापि यावेळी तुमचे काम पुढे आलेल्या प्रकरणात न्याय देण्याचे आहे. टिळक हे एका उच्च जातीतील गृहस्थ आहेत. त्यांच्या राष्ट्राने ऐतिहा सिक लौकिक मिळविला आहे. अशा मनुष्याच्या वेअब्रूचा प्रश्न असता सूक्ष्म- दृष्टीनेच पाहिले पाहिजे. पहिला बेअब्रूचा मुद्दा गोरक्षण हिंदुमुसलमान वगैरे संबं धाचा आहे. येथे टिळकानी धर्माच्या भावनेने गोरक्षणाचा व हिंदुधर्माचा पुरस्कार केला नाही म्हणणे निवळ बेअब्रूकारक आहे. तुमच्या लिव्हरपूल शहरात प्राटेस्टंट व रोमन कॅथॉलिक हे एकत्र रहात असले आणि एखाद्याने प्रॉटेस्टंट धर्माचा उद्योग आरंभिला व एखादी संस्था काढली तर ती कॅथॉलिक लोकांचा अपमान करण्याकरिता काढली असे कोणी म्हणेल काय? टिळकांच्यावर नसते आरोप लादले हीच बेअब्रू. पण गोरक्षणासारख्या संस्था टिकळानी स्वतः काढल्याहि नाहीत. मनात धर्मबुद्धि नसता धर्मबुद्धीचे सोंग घेऊन इतर हेतू साधले असे आरोप करणे हेच वेअब्रूकारक आहे. शिवाजीउत्सवासंबंधाने तीच गोष्ट. जे लेख तुम्हापुढे प्रतिवादीतर्फे आले त्यात ऐतिहासिक विवेचन किती आहे हे पाहिलेच असेल. शिवाजी म्हणजे आधु- निक कालातील एक विभूति. त्याने एक मोठे राज्य स्थापले. त्याचा उत्सव करू नये तर कोणाचा? गणपति उत्सवाचीहि तीच गोष्ट. सर्वानी टिळकावर निर- निराळे आक्षेप घेतले त्याना या लेखातच टिळकानी उत्तर दिले आहे. या धर्मातील काही गोष्टी मुसलमानाना आवडत नसतील. पण असा कोणता धर्म आहे की ज्यातील सर्व गोष्टी दुसन्या धर्माला आवडतात? पण म्हणून दुसऱ्या धर्मातील लोक दुखावतील ह्या सबबीवर आपल्या धर्माची निष्ठा कोणी सोडली आहे काय? दंगे झाले असे दाखविण्यात आले. पण दंग्यांचे मूळ कसे असते हे आपणाला ह्या देशात माहित नाही काय? दोन हाताशिवाय टाळी वाजत नाही. सरकारने दंग्यानंतर ठराव प्रसिद्ध केला त्यात दोन्ही बाजू दिल्या आहेत. सर- कारचा हा ठराव चिरोल साहेबाना कसा मिळाला नाही? आणि बाकीचे कागद तेवढे कसे मिळाले? गोरक्षणाची चळवळ हेच काही दंग्याचे मूळ नव्हे असा अभिप्राय खुद्द गव्हर्नरानी दिला आहे. आता बेअब्रूचा दुसरा मुद्दा घेऊ. तो आखाडे तालीम वगैरेसंबंधाचा. या बाबतीत नातूबंधूंचा व टिळकांचा नसता संबंध जोडला आहे. आणि का? तर नातूबंधूना १८९७ साली कैदेत टाकले होते