पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लॉर्ड सँडहर्स्ट यांची साक्ष यानंतर सर एडवर्ड कार्सन यानी चिरोल सोहवांची फेरतपासणी केली. प्र० - तुम्ही शिवाजीच्या धार्मिक उत्सवाला कधी नावे ठेविली नाही? उ० - नाही. भाग ४ प्र० – तुम्ही टिळकासंबंधी लिहिले ते हिंदुस्थानातील सर्व परिस्थितीचा विचार करून लिहिले? उ०—० - होय. प्र०—-आणि त्यावरून तुम्ही अनुमाने काढली ती बरोबर आहेत? उ०—होय. प्र०- कोल्हापूरकरावर तुम्ही एक स्वतंत्र भाग लिहिला होता? उ०—होय. प्र० – आणि त्यात लिहिल्याप्रमाणे टिळक व ब्राह्मण लोक त्यांच्याविरुद्ध आहेत हे तुम्हाला माहीत आहे? उ०–होय. प्र० - टिळकांचा शिवाजी उत्सव व महाराजांचा उत्सव एकाच स्वरू- पाचे नव्हते? उ० – मुळीच नव्हते. प्र० – सरकारने काही कागद तुम्हाला दिले टिळकाना दिले नाहीत असे असेल पण तुम्ही त्याना देऊ नका असे सांगितले काय? उ० –नाही. (१०) लॉर्ड सँडहर्स्ट यांची साक्ष नंतर सर एलिस ह्यानी लॉर्ड सँडहर्स्ट यांची सर तपासणी केली. प्रथम सर्व नामावळी व वंशाच्या बिरुदावळी वगैरेचे प्रश्न झाले. पुण्यास प्लेगच्या दिवसात काय व्यवस्था होती व टिळकानी काय केले त्यासंबंधाने त्यांची जबानी झाली. ते म्हणाले " लोकाना इस्पितळात नेणे दूषिताना किंवा संशयिताना वेगळ्या जागी ठेवणे घरतपासणी करणे वगैरे गोष्टी अवश्य होत्या. स्वतः मी पुण्यास त्या दिवसात गेलो. इस्पितळे तपासली. पुण्याच्या प्लेगकमिटीवर रँडसाहेब अनुभविक म्हणून अधिकारी नेमण्यात आले. ते मोठे धैर्यवान होते. " सायमन – रँडसाहेबांच्या सद्गुणाचा पुरावा येथे ग्राह्य नाही. कैफियतीत त्याचा उल्लेख नाही. सर एलिस-ज्याचा खून झाला तो मनुष्य कसा होता हे दाखविणे प्राप्तच आहे. डार्लिंग–रँडसाहेबांची जी वर्णने केसरीतून आली होती ती खरी की खोटी हे पाहावयास नको काय? प्र०—तुमच्याकडे रोज रिपोर्ट येत होता? उ० – ० – होता. तपासणीचे काम योग्य रीतीने व्हावे म्हणून सोजीर लोकांची व्यवस्था केली होती. तपासणीतील काही तक्रारी खऱ्या असतील पण मुख्य खऱ्या नाहीत. मी प्रत्यक्ष सोजीराबरोबर टि० उ... २२