पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लो० टिळकांचे चरित्र प्र० - कोल्हापूरचे महाराज हे राजनिष्ठ आहेत? उ० – होय. प्र० – महाराजानी समाधीला वर्गणी दिली ती सरकारने देण्यापूर्वी? उ० – होय.

V प्र० – आणि ती मागण्याकरिता टिळक शिष्टमंडळात गेले होते? उ०- होय प्रथम काही दिवस हा उत्सव साळसूदपणे चालला होता. टिळकांच्या राजद्रोहाने समाधी दूषित होत नाही खास. दिवस आठवा - (८ फेब्रुवारी १९१९.) प्र०- - कान्हेऱ्यानी दोन जबाब दिले नव्हते काय? उ०—होय. प्र० - जवाब प्रश्नोत्तराने घेतलेले आहेत? उ०—होय. भागे ४ प्र०—त्या दोहोंत परस्पर विरुद्ध मजकूर नव्हता? उ० – विशेष फरक होता असे वाटत नाही. प्र० - एका जबाबात तो म्हणतो आमची मंडळी गुप्त नव्हती. दुसन्यात होती म्हणतो? उ०—तसे असेल. स्थापित झाले तेव्हा टिळक मंडालेस होते? उ०- प्र० - कोल्हापुरास शिवाजीचा वार्षिक उत्सव करितात की नाही? उ०- धार्मिक उत्सव करितात. प्र० – कान्हेरे याचे गुप्तमंडळ - होय. प्र० - रथाची मिरवणूक काढतात की नाही? उ० – बहुधा काढीत असतील. प्र०—कोल्हापूरचे महाराज शिवाजीने अफझुलखानाला विश्वासघाताने मारले असे म्हणतात काय? उ० – नाही आणि मीही त्याला विश्वासघातकी बदमाश म्हणत नाही. शिवाजी मोठा मनुष्य असाच आम्ही त्याला मानतो. पण टिळक त्याने खून केला म्हणून त्याला मोठा मानतात. प्र० - पण शिवाजीने खरोखर विश्वासघात केला की नाही याबद्दल वादच आहे. उ० -होय. प्र० -गोरक्षणाची चळवळ फार वर्षापासूनच आहे? उ० – होय. प्र० - गाय ही हिंदुसमाजाकडून पवित्र मानली जाते? उ०—होय. प्र०—आणि मुसलमान तिचा वध करितात. उ० – होय. प्र० – पण त्याच्या धर्मात वध करावा असे सांगितलेले नाही? उ० – नाही. प्र० - म्हणजे हिंदु व मुसलमान यांच्या धर्मातील विरोध दुस्तर होता. उ० – पण टिळकानी पुण्यात तो प्रश्न उत्पन्न करण्यापूर्वी तो इतका दुस्तर नव्हता. प्र० – पण त्यापूर्वी हिंदुमुसलमानात दंगे झाले होते? उ०—होय. पण अधि काऱ्यांच्या अडचणी तेव्हापासून वाढल्या खऱ्या.