पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ चिरेरोल साहेबांची साक्ष ६५ अनुमाने बांधली. नाशिकच्या खटल्यातील पुरावा जबान्या वगैरे मिळविल्या. त्यात टिळकांचा अनेक रीतीने संबंध आलेला दिसला.' स्पेन्स–चिरोल साहेवाना मिळालेल्या जिनसा दाखल करण्यापूर्वी त्या कोणी हजर केल्या दिल्या त्याचा पुरावा नको काय? डार्लिंग–वा! अशा रीतीने हा खटला लांबणार असेल तर मला तो जन्मभर पुरून उरेल. माझ्यापेक्षा एखाद्या तरुण न्यायाधीशाची योजना होती तर बरे झाले असते. चिरोल—ही सर्व सामुग्री जमवून घेऊन आलो आणि मग लेख लिहिले. लॉर्ड मोर्ले हे उदारमतवादी आहेत. त्यांनी माझे लेख वाचूनच त्यांना हे पुस्तक अर्पण करण्याची परवानगी दिली. माझ्या टिपणांचा एक भाराच झाला होता. तो बहुतेक मी फाडून टाकला. माझ्या पुस्तकाचे मराठी भाषांतर झालेले आहे. पण त्याच्यावर टिळकानी फिर्याद केलेली नाही. टिळकाना मी पूर्वी पाहिले नव्हते. मुंबईस कमिशनचे काम चालले तेव्हा त्याना मी प्रथम पाहिले. ही फिर्याद करण्यापूर्वी एक वर्ष टिळकानी माझे पुस्तक वाचले होते. आणि त्याचा उल्लेखहि केला होता. फिर्याद केल्यानंतर एक वर्षाने राजनिष्ठेचा आपला जाहीरनामा त्यानी प्रसिद्ध केला. व्यक्तिश: त्यांचा माझा काहीच द्वेष नाही. आणि लिहिल्यापैकी एकही वाक्य मी परत घेण्याला तयार नाही. सायमन याजकडून उलट तपासणी यानंतर सर जॉन सायमन यानी चिरोल साहेबाची उलट तपासणी केली. त्यात चिरोल साहेब म्हणाले की "टाईम्स मधले लेख पुस्तक रूपाने छापण्या- पूर्वी त्यात कोठे कोठे फरक केले आहेत. विशेष फरक असा ताई महाराज प्रक- रणी केला आहे. हिंदुस्थानात मी पांच सहा महिने हिंडलो. तेव्हा उन्हाळा होता. मी कोल्हापूर महाराजाकडे उतरलो नव्हतो. एक दोन वेळा त्याना भेटलो. संस्थानात गेले म्हणजे राजाला भेटणे हा शिष्टाचारच आहे. कोल्हापुरास काही साधने मिळाली. बाळा महाराज हे कोल्हापूरकरांचे हस्तक होते. टिळकानी कोल्हापूरकरावर कडक टीका केली होती. पण ती ताई महाराज रणी नाही. पुस्तक लिहिताना चंदावरकरांच्या निकालाचा सारांश माझ्यापुढे होता. बातमी म्हणून तो टाइम्सकडून मजकडे आला. टिळकावर खोटा कागद करण्याचा खटला झाला होता. सायमन – मी तुम्हाला सांगतो की ही गोष्ट खोटी आहे. पुन्हा उत्तर द्या. डार्लिंग – तुमच्या प्रश्नाचा त्यांना अर्थ कळला नसावा. सायमन—त्या आरोपाकरिता त्यांचा इनसाफ कधीच झाला नाही. म्हणून तुम्ही म्हणता हे खरे नाही. उ० -होय तुम्ही म्हणता ते खरे आहे.