पान:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरिपंत गोखले यांनी वर्तमानपत्र छापण्याचे नाकारले तेव्हा आठवड्याच्या अंकास वेळ थोडा उरल्यामुळे, स्वतः सुचेल ती व्यवस्था करून विदवांस टिळकांच्या भेटीस गेले, व विठ्ठल छापखान्यात पत्रे छापविण्याची व्यवस्था केल्याचे त्यांना मागाहूंन टिळकांना कळविता आले. पण वर्तमानपत्रे छापविण्याच्या कामी त्यांची सल्लामसलत घेण्याचा प्रसंग थोड्याच दिवसात फिरून दुर्दैवाने आला. सोमवार ता. १४ मार्च, १८९८ रोजी दुपारी चार वाजण्याचे सुमारास विठ्ठल छापखाना ज्यात होता त्या फडक्याच्या वाड्यास आग लागली. आग रात्री नऊ वाजेपर्यंत जोरात होती. वाड्याच्या मागील चौक व देवालय याखेरीज सर्व इमारत जळून खाक झाली. पुढील चौकात तळमजल्यावर शेठ गोकुळदास यांचा लाकडी सामानाचा कारखाना असून त्याच्याच दुमजल्यावर विठ्ठल छापखाना होता. या दोन्ही कारखान्यांतील बहुतेक सर्व माल जळाला. गोकुळदास यांच्या काही खुच्र्या वगैरे थोडे सामान बाहेर काढता आले. पण विठ्ठल छापखान्याचा एक टाईप किंवा कागदाचा तुकडाही आगीच्या तडाख्यात राहिला नाही, आग लागली त्या वेळी केसरीची बाहेरची, म्हणजे जाहिरातीची, बाजू तयार होत होती व आतील मजकुराची पुंफेही तयार झाली होती. मात्र सर्व छापखाना जळाल्याने फिरून पहिल्यापासून वर्तमानपत्राची तयारी करावी लागली. पण या वेळी जगद्धितेच्छु छापखाना उपयोगी पडला, व ता. १५ मार्चचा केसरीचा अंक निम्मा, म्हणजे दहा कॉलमच का होईना, रातोरात काढून दूसरे दिवशी नेहमीप्रमाणे वाटता आला. केसरीच्या सबंध अठ्ठावन वर्षात निम्मा निघालेला असा हा एकच अंक होय. पण तेव्हा आगीची हकीकत वाचून वाचकांना सहानुभूतीमुळे हा निम्मा अंकच सबंध अंकाहूनही थोर वाटला. जगद्धितेच्छ छापखान्याने वेळेवर मदत करून बाजू सावरली हे खरे; पण केसरी कायम छापून देण्यास त्याचेही मालक तयार नव्हते. घरचा आर्यभूषण छापखाना कबूल होईना, मग परक्या छापखान्याला दोष कसा दयावा? जगद्धितेच्छुने आणखी चारदोन आठवडे सवलत देण्याचे कबूल केले, पण कायमची व्यवस्था म्हणून काहीतरी करावयास पाहिजेच होती. याकरिता धोडोपंतांनी टिळकांची गाठ घेतली. पण आगीचे वर्णन मुंबई टाईम्स वगैर पत्रांतून पूर्वी आले असल्यामुळे जेल सुपरिटेंडेंट यांच्या नजरेस ती बातमी पडली होती व त्यांनी ती टिळकांना मुददाम कळविलीही होती. धोंडोपंत दिसताच "आपला छापखाना तर जळाला, पुढे काय व्यवस्था करतोस?' हा पहिलाच सवाल टिळकांनी आपण होऊन केलेला पाहन धोंडोपंतांस बरेच वाटले. कारण तुरुगांतल्या माणसाला भेटून नवीन संकटाची बातमी आपण होऊन सांगणे ही ५२/महापर्व