पान:लोकमान्यांच्या सान्निध्यात - नरसिंह चिंतामण केळकर.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हल्ली लहान आहात. या लष्करी गोष्टींचे महत्त्व अजून तुम्हाला कळत नाही. ते पुढे कळेल." याच भेटीत वुडबर्न साहेबांनी एक गमतीचा प्रश्न मला विचारला. त्यापूर्वी सुमारे एक वर्षभर मी प्लेग-व्हॉलंटियरचे काम चांगले बजाविले होते म्हणून हरि नारायण आपटे व इतर एक दोन प्रोफेसर (मला वाटते त्यात प्रो. गोखले यांचेही नाव होते) यांच्या नावाबरोबर माझेही नाव वर सरकाराकडे कळविण्यात आले होते. ही गोष्ट मला सांगून वुडबर्न साहेबांनी औपचारिकरीत्या माझे अभिनंदन केले. पण ते मला हळून म्हणाले, “तुम्हाला एखादी पदवी देण्यासंबंधाने मी सरकारला लिहिले तर तुमची काही हरकत आहे काय? त्यावर मी म्हणालो, “नको. कृपा करून तसे काही एक करू नका. ते म्हणाले, “मग तुमच्या कामगिरीबद्दल गुणग्रहणदर्शक असे काही करावेसे सरकारला वाटले तर त्यांनी काय करावे?' हा प्रश्न ऐकून प्रथम मी थोडा गोंधळात पडलो. पण लगेच मला उत्तर सुचले. मी म्हणालो, “आम्ही लोक प्लेग-व्हॉलंटियर झालो ते गावच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने. कर्तव्य म्हणून. इतर पुष्कळ लोकांनी असेच आस्थेने काम केले आहे. तेव्हा त्यांना चांगल्या नागरिकत्वाचे सर्टिफिकेट आपण मनाने दयालच. पुणे शहर म्युनिसिपालिटी ही मुख्यतः अशा नागरिक सभासदांचीच आहे. तेव्हा या सर्व प्लेग-व्हॉलंटियरांचे गुण सरकार घेते हे त्यांना दाखवावयाचे तर शहर म्युनिसिपालिटीवरील प्लेगच्या खर्चाचा बोजा सरकारने कमी करावा व म्युनिसिपालिटीवर असलेल्या सरकारनियुक्त सभासदांची संख्या पूर्वीइतकीच ठेवावी. ती आठांनी वाढविणार असे म्हणतात तर वाढवू नये. माझ्या या उत्तराने बुडबर्नसाहेबांना आश्चर्य वाटले ते त्यांना गुप्त ठेवता आले नाही. त्याचे कारण उघडच असे होते की, इतर कित्येक गृहस्थांनी आमच्यासारखेच प्लेग-व्हॉलंटियरचे काम केले होते, पण त्याकरिता रावबहादुरी किंवा रावसाहेबी उघडपणे मागून केलेले अनेक अर्ज कमिशनरच्या टेबलावर पडले होते. म्हणून त्यांचे नेटिव्ह असिस्टंट, बाबासाहेब पेंडसे, यांच्याजवळ वुडबर्नसाहेब मागाहून म्हणाले की, “केळकरांनी माझ्या एका प्रश्नाला अपेक्षेबाहेर उत्तर दिले. याच सुमारास नवीन ‘काळ' पत्राचे संपादक शिवरामपंत परांजपे यांच्याही लेखाकडे प्रेस-कमिटी व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांचे लक्ष गेले. युरोपियन लोक देशी लोकांना छळतात मारतात हा नेहमीचाच विषय परांजपे यांनी लिहिला होता. पण तो अर्थात् त्यांच्या पद्धतीने, म्हणजे कुत्सित विनोदपद्धतीने. ते सरळ रागावून लिहित नसत. वक्रोक्तीचा आश्रय करीत. अशाच रीतीने एका अंकात त्यांनी असे लिहिले होते की, “युरोपियन लोकांनी ५०/महापर्व Scanned by CamScanner