________________
६४ लीळाचरित्र लागले असति : ऐसे जात असति । तवं भटोबासी ह्मणीतलें : कैसीं बरवीं । चोखें पाने फुलें : गोसावीया जोगी वीकतें असति : देवीं ह्मणीतलें : हो नागदेया : गोसावी कवणे ठाइ असति : ऐसे नेणिजे : य-हवी घेवौनि जातों : गेले : एकाचां घरीं वसीले : उदीयांचि अटवेदीये धोत्रे, धोंआवेया आले : देव बैसले : भटोबास धोत्रे धुत असति : गोसावीयांसि उदयाचा पूजावसर जालेया नंतरें गोसावी मा ( मग ) आसनी उपविष्ट असति : तवं देवीं उजाइ केली । सर्वज्ञे झणीतलें : बाइ : उजाइ माहात्मेया सारिखी : माहात्मा आला असे : गोसावी उठीले : दोन्हीं दारसंका ( द्वारशृंखला ) धरूनि अवलोकीलें : तवं देवां भटाते ( दादोस व नागदेव ) देखीलें : आणि खांकरिले । भट मागौते पाहीलें : गोसावीयांतें देखीलें : मग ह्मणतलें : दादा दादो गोसावी की असति । हे। नव्हति ऐसे ह्मणति : गोसावी खालि उतरले : आणि दादोसावरि साइली पडली : मागुते पाहीलें तवं गोसावी । नागदेया गोसावी : गोसावी देवासि ( दादोसासि ) क्षेवं दीधलें : भटोसि मागिला कडौनि खेवं दीधलें : गोसावी मागौता ऐसा श्रीकरू केला : करूनि पूढे आणिले : मग गोसावी क्षेमालिंगन दीधलें : मग गुंफे बीजें केलें : दादास भटोबासाकरवि पुजा द्रव्ये आणवीली : पुजा केली : एकें ह्मणति : केळे आणवीली होती ते गोसावी एकदोनी आरोगण केली : गुळळा : वीडा : मग दादोसीं वीनवीलें : जी जी । अवघीं भक्तजने गोसावीयाची वाट पाहाते असति : जी : गोसावी कवणी ठाइ राज्य करीताति : ऐसे नेणिजे : तरि नागदेवाते बोलाउँ धाडिदेया : गोसावी मानिले : हीराइसा : धाडा ः ॥ छ । मग भटोबास बोलाउँ धाडिले : ॥ ७ ॥