________________
पूर्वार्ध गोसावी तुमतें बोलाउं पाठवीले असे : मग : डखला : ह्मणीतलें : ऐसे गा आमचे गोसावी आपुलें ऐश्वर्य लोपीती : मग नासीकासि आले : उपाध्या : नाथोबा : भेटि जाली : दंडवते घातली : श्रीचरणा लागले : मग मागील अवर्षे वृत्तांत सांघीतलें : सर्वज्ञ ह्मणीतलें : कैसे ह्मणे : भगवा : शोधु : वेळा तिन पुसीले : हीराइसा : मग बटिका काइ ह्मणे : भगवा ः ॥ छ । माघौतें सांघीतलें : सर्वज्ञे ह्मणीतलें : कैसें जालें : ब्रह्मवीद्या सुपीं सूनि वीकीजत असीजे : हीराइसा : तथा : कैसी बापुडी ब्रह्मवीद्या : ।। छ । देखीलें बाइ : बटिकुरें पुसति : यातें : तो यांसि ब्रह्मवीद्या सांघे ॥ २ ॥ नाथोबा केसशनी वीस्मयो : । : चांगदेवो भट भीक्षे गेले : तेयांतें बाइली देखिले होते : मग नाथोबा गाउनि आले : ॥ : गोसावीयांसि उदयाचा पूजावसर जालेया नंतरें गोसावी वीहरणा बीजें केलें : पाणीवथा बाइली देखीलें : परशरामबास : परिश्रया बीजें केलें : रामेश्वर बास : आवो आवो माए । कालिचा बटिकू बोडीका की आजिचि येवढे कैसे : मग गोसावी उभे राहुन | उत्तर दीधलें : बाइ : हा तो नव्हे : तो याचा भाऊ : हे दोघे जावळाचे : तो गांवा गेला : हीराइसा : हे दोघे सारिखेचि : जावळाचे : तो गांवा गेली : हा आजि गाउनि आला : ॥ ३ ॥ छ ।। | मार्गी चौरंगीवीद्या नीरूपण : ॥ : गोसावी मार्गी बीजे करीत असति : | नासीकीहनि नीगीलीया : वृक्षातळीं आसन : बाइसी ऋणीतलें : बाबा : एथ | आसन किजत असिजे : परि एथ उदक नाहीं : मग उपाध्यातें ह्मणीतलें : | ऐसे ऐसें जा पा : परशराम बास : बटिका : इकडे : इकडे : हा नसैल : | रामेश्वरबास : शोध : तथा बटिका : पाहा पां : उपाध्ये गेले : तिकडे पाहीले : तवं उदक देखीले : सागळ भरीली : मग ह्मणीतलें । ऐसे गा आमचे गोसावी : की अमूकीकडे उदक असे : ऐसे सांघती ना कां : परि आपुले ईश्वर्यं ( ऐश्वर्य ? ) लोपती की : मग उदक घेउनि आले : गोसावीयांसि आरोगण ऐसे अवलोकिलें : तवं पळसाचा वृक्ष तोडिला असे : एके ह्मणति : सालेचा : मग सवंते भवंते : | बरवे कोंभ निगाले । असति : सर्वज्ञे ह्मणीतलें : देखिलें : गा : याचा तर स्वभावो : ऐसे माणसाचा ठाई दीसे । तरि चौरंगीचि वीद्या जाली :