________________
लीळाचरित्र ह्मणीतले : आवघे तुझी एथौनि जा गा : हे एकाकी असैल : तुह्मी एथीचीये प्रवृत्ति वीखो हों जाणाना : तुमचा एथु निरोधु की : तुह्मां एथ असतां : अवीधु होत असे : तुह्मी एथ असतां आनष्टचि होत असे : तुह्मीं एथ काइसेया असा : तुह्मीं जा : ते आवघे उगेचि राहीले : सर्वज्ञं ह्मणीतलें : चांगो : हे कव्हणी न वचति : तुं जाए : तुह्मी आदि होए : ॥ हो कां जी : ह्मणौनि चांगदेवो भट नीगालें : बाइसीं ह्मणीतलें : ते कव्हणी न बचतीचि : तरि यातें कां पाठवीजत असीजे : बाबा : गोसावी उगेचि : दुसरा दीसी सर्वज्ञ ह्मणीतले : तुह्मीं कव्हणी न वचा : तरि : चांगोसेंचि काइ केले : उखलेया जा : चांगोते बोलावा : बाइस ह्मणीतलें : तो काइ एइल : बाबा : यासी काइ भेटत असे : सर्वज्ञ झणीतलें : बाइ : याची यात्रा काइ निर्फळ जाइल : हीराइसा : जावो की बाइ याची यात्रा : ॥ छ । : बाइ बापुडी बापुडी बटीके डोगरे डोंगर गीवसीते असति : शोधु : लंघीते एते असति : येथचे दर्शन घेयावीया : मग गावां जावे ऐसा परिछेदु केला असे : बाइ तथा : बापुडी झाडा खेत्रे देते एतें असति : एथचे दर्शन घेयावे : ऐसे केले असे : ॥ १ ॥ : उपाध्या नाथोबा भेटि : । : उखले गेले : चांदोरी अग्नष्टीके जाडि आड बांधली : मग तेथ पाठी घातली : उपाध्ये नाथाबा पर्वकारणें न टकेचि : मा : गोसावीयातें गवसत एतें असति : सिनरा आले : भिलमढीये संन्यासी होते : तेयाते पुसीलें : एथ आमुचे गोसावी होते कीं : काइ कराल : गोसावी : ब्रह्मवीद्या तरि आह्मी सांघौनि । तेहीं ऋणीतलें : आह्मीं काइ तुमतें ब्रह्मवीद्या पुसत असों : आह्मी आपुलेया गोसावीयांते पुसत असों : ऐसी गा बटीकुरे चाळवीली असति : तरि : आह्मांसि दंडवत करा : मां सांधौनि : तेंहीं ह्मणीतलें : आधी सांगा : मग दंडवत करूनि । कैसी गा बटकुरे आग्रहाचीं : मग : दंडवत केलें : जा तुमते गोसावी सत्रासिंगा गेले असति : निगाले : मग वीचारीले : डोंगरा आंतु जावों नये तरि : चांदोर पांगुरणे ठेउं : मग : जावों : ह्मणौनि चांदोरी आले : तवं गोसावीयाची जाडि देखीली : मग ह्मणीतलें : हे जाडि गोसावीयांची नव्हे : ह्मणौनि : आले : हे काइ डखलेया : गोसावी कव्हणे ठाई असति । तेंहीं ह्मणीतलें : गोसावी नासिक असति :