Jump to content

पान:लीळा चरित्र, भाग दुसरा (Leela Charitra, Second Part).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वाध हे तुमते पुसत होते : ॥ छ ॥ : बाइस पुसीले : बाबा : आपण केंवी जाणिजे : बाइ । एथ पाणिभातु : बाबूळसँगा : संपादिलीया : बाइ : एथीचे एजमान : हीराइसा : बाइ : तो एथीचा एजमान : एथ पाणिभातु बाबूळसेंगा आरोगणा दीधली : ॥ छ । : मग तीयें बीदारा गेली ः ॥ ३ ॥ : देव भटा भेटिः ॥ : मग दादोस पाने पोफळे घेउनि आले : मग आवघींचि गोसावीयांचीया दरिसना आली : मग दादोसा मढीये आंतु भेटि जाली : गोसानी दादोसांसि खेव दीधलें : दादोसी दंडवते घातलीं श्रीचरणा लागले : येरी अवघां दंडवते घातलीं : उमाइसें महदाइसे श्रीचरणी लागली : सर्वज्ञ ह्मणीतले : त्रयंबक बाइया एथीचेयाचि : मा । अवघी बैसली : ॥ छ ॥ ४ ॥ : भटां तांबूळ ग्रहण : ॥ : गोसावी तांबुळ परित्यजीलें : मग बाइस श्रीमुखीचे तांबुळ अवघेयांसि प्रसादु दीधला : दादोसी मागांचि भटोबासातें वारिलें होतें : नागदेया : गोसावी आमचे गुरु : ह्मणौनि । आह्मीं तांबोळ घेवोनि । तुवां नेघावें हो : तांबाळ दीधले तेव्हळि तेहीं वीचारिलें : जरि ईश्वरपुरुषु होती तरि आह्मांसि गोमटे होइल : ना : तरि : आह्मी थोडे याचे तांबुळे घेतले असे : ह्मणौनि : घेतलें : आणि : स्तिति जाली : ॥ ५ ॥ तथा स्थित्यांतर : ॥ : अस्तिति भोगीली : मग केतुलेया एका वेळां भंगली : मग गोसावी भटाबासाते पुसीले : महात्मेयां पासौनि सुखस्तीति आति : हीराइसा : तथा भटो : तुह्मां माहात्मेयां पासौनि सूखस्त्रास्थ्ये आति. ॥ छ । : जी जी : सांपें कणु एक अधिक : सर्वज्ञे ह्मणीतलें । तें न । ३ स्थीत्यांतर : हीराइसा : एथौनि तुह्मां स्थित्यांतर : गा : ।। छ । ६ ॥ . । तथा श्लेष्मा हरेणी अभ्यासू नराकरण ः ॥ : गोसावी बाहीदि वी , तवं भटबास पैलाकडीनि येत होते : गोसावी पुसीलें : के गेले होतेति : जी जीः श्लेष्मा झाडं गेला होतां । सर्वज्ञे हाणीतलें : जे तुह्मां जालें असें : तेणे सिवनीं रांड नव्हे : तथा मुंगी : मा : श्लेष्मा काइ झडैल : ।। ७ ।। : ।