Jump to content

पान:लीळा चरित्र, भाग दुसरा (Leela Charitra, Second Part).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वार्ध : भगतां श्रीनगर दाखवणे :॥ : गोसावी श्रीनगरासि, बीजें करित असति : तवं बाइसी अडवांगौनि बरवे वृक्ष बरखीं. देउळे देखीलीं : मग पुसीलें : बाबा : हे कवण नगर : सर्वज्ञे ह्मणीतलें : बाइ : हे श्रीनगर ॥६॥छ।। भीलमढीये अवस्थान : ॥ : शोध : भीलमढीये आंतु देवतेपूर्वे उत्तरामूख आसन : ॥ १ ॥ : : स्वयंनामगोपन : ॥ : माहादेव राव ठाणेया कटकै गेला : होता : तो सिनरा आला : तेणें ह्मणीतलें : हें नगर बरवें : तरि एथ गोसावी असति : ह्मणौनि : पाल्हा डांगेयातें पाहों धाडीलें : ते अवघी देउळे पाहुनि : | भिलमदीयेसि आला : एथे काइ असति : हा धाकुटा मढू : ह्मणौनि : आपण बाहरि राहिला : जनु : पाहों धाडीला ; दुपाहाराचां पूजावस्वर जालेया नंतरें आरोगण : गुळळा : वीडा पहुड : उपहुड करूनि सोरठिए जाडीचे प्रावण करूनि : गोसावी मदळसेसीं उभे असति : तवं तेणें पुसीलें : श्रीचांगदेवो राउट : गोसावी : एथ असति की : सर्वज्ञे ह्मणीतलें : माति : मा इहां कोइ नथी : कांहीं नथी : कमलाइ : शोधु : उंहुं नाहीं : बाइ एकी थी : भिक्षा हउ इहांछों : हीराइसा : चांगदेवो राउळ नेणों : बागदेवो राउळ नेणों । मातारी ( ह्मातारी ) एकी छे : ते गावमां हैं भिक्षामागन गैइ छ : इउ इहां अछों : तथा : माहातुमे बाहातुमे कांहीं नथी : हउ इहां छ : मग गेला : ॥ २ ॥ : | उमाइसा भेटि : ॥ : आबाइसाचा वडिलु पुत्रु : सारंगपाणि होता है तो सरला : तेणें दुखें रावसगांव भटोबासीं गुंफा केली : ते तेथ राहीली : मग : तेथ दादोस आले : दादोसाते भीतर देखीले : आणि तमले : दारी वाहाणा होतिया : तिया बाहीर टाकालिया : दादोसीं घोंगडे घेतलें : जाउन बाहिरिल वडाखालि बैसले : उमाइसे तेयातें देखौनि पळाली : नि रीत असा हो आबै : याचि कारणे तुह्मी येथे गुंफा केली की : हे काइ नागदेया : दादोस निकें माहात्मे : या पासौनि आनंदु होए : होइल मां काई । पैयेसि उमैयेसि होइल : हे तरूणेधारे : याही तरुणीया : धारीया : अस्त्रीयेसि पुरुषापासौनि होइल : आणि काइ : ऐसे कैसे ह्मणत अससि : तरि