Jump to content

पान:लीळा चरित्र, भाग दुसरा (Leela Charitra, Second Part).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वार्ध तार एवो एइल : गेली : दरिसन घेतलें : पुजा केली : आली : रायें पुसीलें : दरसना व वचाचि ते काइ : ना : गेलो होतो : हे नव्हे : आतांचि आलों : खित होते ते बोलावीले : मग तेयांस कोपों लागला : एक ह्मणति : आह्मीं देखाचे ना : एक ह्मणति : देखों : परि : कांहीं करवेना : मग ह्मणीतलें । पुरुखु सामर्थ्यवंतु असति : तेणें क्षेपणीकापूढे सांघीतलें : तेहीं ह्मणीतलें : राणियतें पूसा : ते आह्मासि उघाणी करीती : राणियेते पुसीलें : तुमचे गुरु आमचीया रुसी उघाणी करीति : तीया म्हणीतलें : आधीं करीति : सभामंडप बैसों घातलें : तयति बोलाउं धाडीलें : गेले : रायें तुमतें बोलाविलें असे : न . येतीचि : तेही म्हणीतलं : होए भीयाले : राणीये अभिमान पडीला : जा ऐसे म्हणावें । तुमतें राणियां बोलावीलें असे : ऐसे सांघीतलें : आणि : आले : पाई पाउवा ऐसे आले : मग उघाणीं प्रवर्तली : अदंडीनाथ क्षेपणिक अडीले : इतुलेनि तेही म्हणीतलें : हे काइ : हे वागेल म्हणा : आतां तुझी आ# सामथ्र्ये भांडो : हो कां : आमची अमृत कूपी स्वर्गीचे अमृत आणिल : तेही ह्मणीतलें : आह्मीं आणु नेदं : हो कां : कूपी अभिमंत्रुनि परिहरिली : गेली : अमृत घेउनि येत होतीः अदंडीनाथ डावीये पाइंची पाउ भिड भिड म्हणौनि परिहरिली : अमृत कुंडीहुनि अमृत घेउनि येत होती : पाउ तीस ठुस ठुस करि लागली : आणि कुपी फुटली : तिन कोरे जाली : ते ती ठाई पडली : ते तिन तीर्थे। जाली : करण वीहीरा : उपरकुंडी : सिवाळे : सर्वनें ह्मणीतलें : भटाचार्या मागां उडती अदंडीनाथे वेद प्रतिष्ठीले : ते निवर्तले: तेयाचे देउळ हैं : ।। १५ ।। : । तथा भिड शब्द कथन : ।। : अदंडीनाथाचे देउळ : पसिमामुख : ते निवर्तले : मग राणियां तेयाची प्रतीष्ठा केली : देउळ केले : हीराइसा । तथा : मग ते तेथे पाताळ गुंफसि साधनिं रिगाले : ॥ छ । गोसावी तेथ बीजें केलें : सर्वनें ह्मणतलें । हे अदंडीनाथाची गुंफा गा : एथ अद्यापि भिड भिड ऐसा शव्दु वर्ते : तेथ जोगी येति : भिड भिड ऐसा पुरुखाची शब्द आंतुलि कौनि होए : मग : जाति : भक्तजने आइकों ठाकलीं :॥ १६॥