________________
२ 9 पूर्वार्ध उभे ठाकले : तवं पुढीले भितिसी भव्य पुरूखु : एकू कमळाची आंगी लेइलां असे : ऐसा देखीला : चौका खालि उभे ठाकत आणि न देखति : भक्तजन पुसीलें : हे काइ जी : सर्वज्ञे ह्मणीतलें : आतां जा : पाहा : शोधु : हे काइ गा पुरूषु जी ॥ छाया पुरूषु सीधाचा संकेतुः शोधु :॥ः हा सीधाचां आगम समो : जेणे केलें : तेणें आपुलीया छाया ठेवीली असे : हीराइसा पाठ : छाया पुरूषु सकळा करितेनि पुरूखें एथ आपुली छाया निक्षेपीली असे : ॥ ५ ॥ : | आगम समो : ।। ३ एकुदीस गोसावीयांसि उदेयाचा पूजावसर जालेया नंतरे गोसावी वीहरणासि बीजें केले : माणिकेश्वरी एका लेणेयासि वीवरें बीजे केले : पुढां गोसावी : मागां बाइसे : सर्वज्ञे ऋणीतले । बाइ : मागा धरा : मग या मागे यराते धरून : ऐसीं भक्तजने आवधीच कासे लावीली : वीवरें वावरे गोसावी बीजें करिताति : तवं एके ठाई भगकरि उजेड पडिला : तवं पुढां एकु घटु मांडीला असे : घटा भवंती भवंती : डोइ गुंड गुंड : बैसली असति : बाइस पुसीलें : बाबा : हे काइ : बाइ : हा आगम समो : शोधु : बाई आगमीकाचा आगम समो वर्तत असे : ॥ छ ।। : ह्मणौनि पुढारें बीजें केलें ; ते वीवर इसाळुवाचिए लेणा उसासिलेः तेणें ठायें गोसावी बीजें केलें : लेणा उभे ठेले : तवं यळापुर देखीलें : बाइस पुसीलें : ।। : बाबा हे कवण नगर : सर्वज्ञे ऋणीतलें : बाइ : हैं येळापुर : हे काइ बाबा : इतुकी भुई आलों : ।। : सर्वज्ञं ह्मणीतलें । बाइ : हा अवघा डोंगरू पोकळ असे : कोन्ही एथीचे रिगणे नगणे जाणे ना ः ॥ छ । छ । : चांगदेवो भटा लेणा परिख ।।: गोसावीयांसि उदेयाचा पूजावसर जालेया नंतरे गोसावी एका लेणेया बीजें केलें । तेथ आसन : चांगदेवो भटातें का वसिये पाठवीले : लेणयांकडे जा : गेले : तवं आडवी तिडवी पडली देखिलीं । एकीकडे एकाचे पाय : एकीकडे एकाचीया डोइया : ऐसी पासली पडली असति : डोळे मिलमिलवीत : बोठे फुलफुलवीती : आणि : भीयाले : गोसावीयांपास आले : दंडवतें घातली : श्रीचरणां लागले : हीराइसा : सर्वज्ञं ह्मणीतले : कां गा : अलेति : ॥छ। मागील वृतांत आवघांच सांघीतलें : भियाला हाणौनि