पान:लाट.pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येळेवर आठवेना. तेवढा आठवल्यापरीस देवीला येळ लागायचाच. आपन तरी काय सांगनार देवदेवतांबाबत?"
 तेवढ्यात विसूचं घर आलं. तो निघून गेला आणि विश्राम काळोखात आपल्या घराकडे चालायला लागला.

 या गोष्टीला पाच वर्षे होऊन गेली आहेत. हसनखाननं देवीच्या नावावर सोडलेला बोकड भारी माजला आहे. साऱ्या गावचं खाऊन माजोर झाला आहे. गावाचं निसंतान करतो आहे. देवीचा बोकड असल्यामुळे त्याला कुणी हात लावायलाही धजत नाही.

 आणि पस्तिशी उलटलेला पोक्त हसनखान आपल्या फलाटीवर बसून, कोणा आल्यागेल्याला, आपल्याला अवलाद झाली की तो बोकड देवाला 'अरपन' करण्याच्या गोष्टी सांगतोच आहे!

शेरणं । ५१