पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आणि ती पळू लागली. तिला दुख-या रक्तबंबाळ अंगठ्यामुळे मनस्वी वेदना होत होत्या, पण मनात एक खुन्नस भरून आली होती. शिवा पारध्याला जिंकायची, गाठायची. तसं झालं तर 'वन्स अगेन आय विल बी अॅट दी टॉप ऑफ दी वल्र्ड' ही भावना मनाला उभारी देत होती.
 काही सेकंदांतच तिनं गती पकडली. अजूनही तो शिवा पारधी नजरेच्या टप्प्यात होता. त्याला नजरेआड करणं धोक्याचं होतं. तिनं गती वाढवली. केवळ भाकरी भाजी व कधीमधी मांस-मच्छी खाणा-या तिच्या काटकुळ्या देहात व पायात कमालीची ताकद संचारली. तिनं पाहता पाहता त्या शिवा पारध्याला गाठलं आणि त्याच्या कानाखाली काडकन वाजवीत आपली बॅग हिसकावून घेतली व म्हणाली, “भाड्या, आज बरा गावलास चोरी करताना. तुला जेलमध्येच पाठवते. तोवर इतर लोक तिथं जमा झाले होते. त्यांनी शिवा पारध्याला पकडून ठेवलं आणि आपले हात-पाय मोकळे करीत मागं शिवानं लंपास केलेल्या त्यांच्या वस्तूंच्या रागानं चांगलंच बदडून काढलं.
 तिथं काही वेळानं एक लाल दिव्याची गाडी आली. ती थांबली आणि त्यामधून कलेक्टर मॅडम उतरल्या. मीनानं त्यांना पटकन ओळखलं. मॅडमसोबत एक पोलीस अधिकारीही होते. ते मात्र तिला अपरिचित होते.
 मीनानं मॅडमला अभिवादन करीत घडलेला प्रकार सांगितला. तसे ते पोलीस अधिकारी मॅडमला म्हणाले, “ग्रेट, आय वोन्ट बिलीव्ह! १० मिनिटात साडेपाच सहा किलोमीटर पळून या पोरीनं शिवाला पकडलं. शी विल बी ए ग्रेट अॅथलिट - ए टू इंटरनॅशनल लॉग डिस्टन्स रनर!"
 कलेक्टर मॅडमनं त्या पोलीस अधिका-यास मीनाच्या शाळेत नुकत्याच झालेल्या बक्षीस समारंभामध्ये मीनानं कसं तिला पी. टी. उषाच्या पुढे जायचं आहे, हे आत्मविश्वासपूर्वक म्हटल्याचं सांगितलं. दोघं आपासात इंग्रजीत बोलले. त्यातल मीनाला थोडं समजलं, पण बरंच डोक्यावरून गेलं, पण तिच्याबद्दल ते बोलत होत हे नक्की. मग कलेक्टर मॅडम तिला म्हणाल्या.
 “मीना, रियली वन डे यू विल बी अॅट दी टॉप ऑफ दी वर्ल्ड. हे एस. पी. साहेब आहेत. आम्ही ठरवलं आहे की, तुला पुण्याच्या बालेवाडीतल्या क्रीडा प्रबोधिनीत पाठवायचं. तिथं तुला रनिंगचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळेल."

 आणि प्रबोधिनीत तिला सुरेश बाबूसारखा कोच भेटला. आणि सेऊल गेममध्य पहिले आंतरराष्ट्रीय ब्राँझ पदक मिळवून तिनं श्रद्धापूर्वक कलेक्टर मॅडम, ज्या आता मंबईला मंत्रालयात प्रसिद्धी खात्याच्या सचिव आहेत त्यांना; एस. पी. जे आता पुण विभागाचे डी. आय. जी. आहेत त्यांना आणि गुरू कोच सुरेशबाबूला खरीखुरी स्वः कामईची गुरुदक्षिणा दिली. त्यानंतर मागील महिन्यातल्या दोहा आशियाई स्पर्धेत ८०० मीटरमध्ये रौप्य पदक मिळवून कलेक्टर मॅडमचा विश्वास पण तिनं सार्थ

९८ ॥ लक्षदीप