पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जिद्द बाळगून होती. वा-याच्या वेगानं पळणं, हा तिचा जणू स्वभावधर्म आणि कधीही न चुकवला जाणारा दिनक्रम बनला होता. ही पहिली अधिकृत चौदा वयोगटाखालची | शर्यत बाराव्या वर्षी सातवीच्या वर्गात तिनं जिंकली होती. तिनं साधलेली वेळही राज्यस्तरावर नवा विक्रम म्हणून नोंदली गेली होती.
 गावी परतल्यावर ती चकचकीत बॅग घेऊन प्रथमच मीना शाळेत निघाली होती. नेहमीप्रमाणे पळत वाव्याच्या सुसाट गतीनं. शाळेच्या रस्त्यावर तिच्या अनेक मैत्रिणी व शाळाबंधूंना मागं टाकत. खोडकरपणानं मैत्रिणीची वेणी ओढ, कुणाला टपल्या मार, तर कुणाची टोपी उडव, अशा खोड्या करीत धावताना तिला मजा यायची.
 आजही असंच मित्र-मैत्रिणींच्या खोड्या करीत त्यांना मागं टाकीत ती पुढे धावत होती. मनात तीच उत्तेजक प्रेरणादायी भावना होती. “आय अॅम अॅट दी टॉप ऑफ दी वर्ल्ड.” शाळेत वार्षिक समारंभाला आलेल्या जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडमनं त्यांच्या भाषणात “उच्च ध्येय ठेवा. त्यासाठी जिवापाड प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही सर्वोच्चपदी जाल! असा उपदेश करताना एक यशाचा मंत्र दिला होता. 'ऑल्वेज इमॅजिन देंट यू विल बी अॅट द टॉप ऑफ दी वर्ल्ड! मीनाला तो मनस्वी भावला होता. कलेक्टर मॅडमच्या हस्ते बक्षीस घेताना त्यांनी, “तू पुढे काय होणार?' असं विचारलं, तेव्हा ती पटदिशी म्हणून गेली, “मॅडम, मला पी. टी. उषापेक्षाही मोठं यश मिळवायचं आहे. ऑलिम्पिक पदक, येस मॅम, आय विल डू इट. तुमचा उपदेश मी कधीच विसरणार नाही. आय विल बी अँट दी टॉप ऑफ दी वर्ल्ड." मॅडमचे ते इंग्रजी शब्द तिला पाठ झाले होते, जे तिनं पोपटाप्रमाणे अचूक म्हणून दाखवले होते.
 मीनाच्या मनात हीच उत्तेजित भावना तरळत होती आणि पळताना देहानं विजेचा गती पकडली होती. अचानक रस्त्यावर दगडाला ठेच लागून ती थांबली आणि पटकन खाली बसली. दप्तर बाजूला पडलं गेलं. तिनं रक्ताळलेला अंगठा रक्तस्राव बंद व्हावा म्हणून दाबून धरला.
 आणि मागन आलेल्या मैत्रिणी ‘चोर - चोर' म्हणन ओरडल्या. मीनान वर मान करून पाहिलं. तिची चकचकीत बॅग घेऊन एक चोरटा पळताना तिला दिसला." हा तर शिवा पारधी आहे. कुणाच्याही वस्त लंपास करून वेगानं पळून जाणं, ही त्याची खासियत होती. तो जीपनं पाठलाग करणाच्या पोलिसांनाही गुंगारा देण्यात वस्ताद होता.

 मानासाठी पहिल्या विजयाची स्मती म्हणून बक्षीस मिळालेली बॅग अनमोल - आपल्या नजरेसमोर ती चोरटा पळन नेत आहे. हे तिला सहन झालं नाही, ती वदना सावरीत उठून उभी राहिली. “मीही रनर आहे आणि शिवा पारध्याला हरवलं पळत जाऊन गाठलं पाहिजे आणि आपली बॅग पुन्हा मिळवली पाहिजे. तो माझा दुसरा विजय असेल!"

लक्षदीप ॥ ९७