पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७. फिरुनी नवी जन्मेन मी!



 हा हो.. खरंच मला मरायचं नाहीय. मला तर उलट वान्याच्या गतीनं धावायचंय. वर्ल्डमधील सर्वोत्तम लाँग डिस्टन्स रनर बनायचंय मला महिलांमध्ये, आत्ताशी तर सुरुवात आहे माझी, आधी सेऊल व हे आताच द. - द- दोहा...."
 आणि तिनं मान वळवत ती बेडवरील उशीत खुपसली... अनावर हुंदका दाबण्यासाठी. तो दाबण्यात व आपल्या आक्रंदनाचा आवाज होऊ न देण्यात ती यशस्वी झाली खरी, पण अवघा देह त्यानं थरथरत होता.
 सरकारी दवाखान्याच्या स्पेशल रूममध्ये मीनाचा - तिनं काल आत्महत्त्येच्या केलेल्या असफल प्रयत्नांच्या संदर्भात जबाब घेण्यासाठी आलेला पोलीस इन्स्पेक्टर अवाक होऊन क्षणाक्षणाला बदलणारे तिचे रंग पाहात होता. क्षणभर तो जबाब नोंदवण्याचं विसरला होता. त्याच्या सोबत आलेला पोलीस रायटर हातात उघडे पेन व फाईल घेऊन किती वेळापासून इन्स्पेक्टरांच्या जबाबाच्या संदर्भात डिक्टेशनची वाट पाहात अवघडून उभा होता. तसेच सिव्हिल सर्जन आणि ड्यूटी इन्चार्ज डॉक्टरही तिथं उपस्थित होता. जबाब देताना पेशंटरवर अवाजवी ताण तर पडत नाहीं ना हे पाहण्यासाठी.
 एका महिन्यापूर्वी मीना राज्याची नव्हे तर पूर्ण देशाची अभिमानबिंदू झाली होती. एका दगडफोडीचं पिढीजात काम करणा-या ग्रामीण पाथरवट भटक्या जातीच्या समाजाची मुलगी दोहाच्या आशियाई खेळात आठशे मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदकासह दुसरी आली होती. इंडियन अॅथलेटिक्स स्क्वाडमध्ये ती वगळता साच्या खेळाडू मुली या शहरी-निमशहरी भागातल्या होत्या. मीना मात्र मराठवाड्याच्या उस्मानाबाद या दुष्काळी प्रांतातून आलेली, पाथरूडची. त्यामुळे तिच्यावर सर्व स्तरातून तिच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव झालेला.
 आणि आज....?

 कवळ तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणून ती वाचली होती. रोजगार हमीच्या कामावर गेलेली मीनाची आई दुपारीच परतली होती. कारण एका शेतक-यानं अचानक

लक्षदीप ॥ ९५