पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनिच्छेने मस किलिंग करते,जगणे हे जेव्हा मरणाहून दुःसह होते.तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांच्या परवानगीने त्याचा मृत्यू घडविला जातो.त्याप्रमाणे कथानायिका आपल्या मुलाला नाहीसे करते.पुढे ती मनाला विरंगुळा वाटावा म्हणून बालवीरांच्या साहसकथा लिहिते.त्या कथा लोकप्रिय होतात.अनेक बालवाचकांची तिला पत्रे येतात.तिच्या लेखनाची वाचकप्रियता एका बाजूला उंचीवर आलेली असता तिच्या कथेतील मानसपुत्र नंदूचा ती शेवट करते.याचा तिला त्रास होतो.प्रत्यक्षातील जगणे आणि कलानिर्मिती यातला हा ताण आहे.कलानिर्मितीतील जीवनानुभवावर प्रत्यक्षातल्या जगण्यातले दाब असतात.या द्वंद्वातून या कथेची निर्मिती झाली आहे.'अंतरीच्या गूढगर्मी कथेत मानवी मनातील भावस्पंदनाचा विचार आकारला आहे.आत्मपर निवेदनातून उलगडलेली ही कथा आहे.कथेतील मी मानसशास्त्रज्ञ आहे.औरंगाबादला जया नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झालेला.तिचे आधी मकरंद नावाच्या तरुणाशी लग्न ठरलेले; परंतु लग्नापूर्वीच एका अपघाताने तो मरण पावलेला.तिच्या मनात मकरंदविषयी एक घर असते.मात्र हळूहळू ती ते विसरते.मात्र लग्नापूर्वी नव-याला हा विषय कधी न काढायच्या अटीवर ती लग्नास तयार होते.पुढे त्यांना मुलगा होतो.तो तिला अनाहूतपणे पत्राने मुलाचे नाव मकरंद ठेवायला सांगतो.त्याच्या मनातील मकरंदविषयीची मत्सरभावना वा त्याची अदृश्य छाया त्याला सतावत होती.स्वत:च्या सुखाला कुरतडणाच्या व्यथेमुळे कळत न कळत तो पत्रात उच्चार करतो.आपण केलेल्या उच्चाराबद्दल त्याच्या मनात कमालीचा अपराधभाव आहे.मात्र कथेचा शेवट सुखान्त स्वरूपाचा आहे.मानवी वर्तनात सुप्तपणे वसत असलेल्या अंतरीच्या भावनांचा आविष्कार या कथेत आहे.
 ‘पाणी! पाणी! पाणी!' या कथासंग्रहात महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनातील पाणी या विषयसूत्राभोवतीच्या कथा आहेत. मराठीतील अशा विषयावरच्या या लक्षणीय स्वरूपाच्या कथा आहेत. ‘भूकबळी' ही उल्लेखनीय कथा यो संग्रहात आहे. महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीवर भाष्य करणा या कथा या संग्रहात आहेत. मराठवाड्यातील एका दुष्काळी गावी रोजगार हमीवर काम न मिळाल्यामुळे ठकूबाई या स्त्रीचा उपासमार होऊन बळी जातो. त्या घटनेचे तहसीलदार शिंदे या संवेदनशील अधिका याच्या नजरेतून हे वास्तव कथन केले आहे. तहसील कचेरीतील क्लार्क, तलाठी, मुकादम, मुनीम, कृषी सहायक व रेशनदुकानदार मालक; गरीब माणसांना कसे नाडतात, शोषण करतात याचे विदारक असे चित्र या कथेत आहे. काळगाव दिघी या मराठवाड्यातील एका छोट्या गावी गाडीलोहार कुटुंबातील स्त्रीच्या मृत्यूचे केविलवाणे व करुणास्पद चित्र या कथेत रेखाटले आहे. प्रशासनातील यंत्रणा सामान्याच्या शोषणाला व मरणाला कशी कारणीभूत ठरते याचे बारकाईने चित्रण या कथेत आहे. ‘दौरा' या कथेतही दुष्काळी अवर्षणग्रस्ताची पार्श्वभूमी आहे. मराठवाड्यातील रोटेगाव वैजापूर भागातील



८ ■ लक्षदीप

८ 1 लक्षदीप