पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यामुळे चिडून जाऊन पाटलानं आपल्या विहिरीचं पाणीच साच्या दलितांसाठी बंद करून टाकलं! याचा जाब विचारायला किसनभाई मिलिंद कॉलेजमध्ये शिकणाच्या आपल्या भाच्यासमवेत पाटलाकडे गेले असता त्यांना शिवीगाळ करून पाटलानं हाकलून लावलं, “जा, ही माझी विहीर आहे. मी माझ्या मर्जीनं पाणी देतोय. तुम्हाला काय करायचं ते करा."
 तेव्हा किसनभाऊच्या भाच्यानं सरळ तालुक्यात जाऊन पोलीस स्टेशनमध्ये पी. सी. आर. ची केस केली आणि दुस-या दिवशी पाटलाला अटक झाली. सारा गाव दलितांविरुद्ध खवळून उठला. त्यांनी त्यांचं काम व मजुरी बंद केली. पिठाच्या गिरणीत दळण मिळेना, की गावाच्या दुकानात किराणा मिळेना. त्या बहिष्कारानं त्यांची चांगलीच कोंडी झाली.
 काही दिवस हा बहिष्कारही सहन केला, पण त्यामुळे जीवनगाडा चालेना. तशी त्यांनी पुन्हा आपल्या दलित नेत्यांना कल्पना दिली. त्याला पुन्हा वृत्तपत्रात मोठी प्रसिद्धी मिळाली. समाजकल्याणमंत्र्यांचा दट्या आला व तहसीलदार गावात आले. त्यांनी शांतता समितीची बैठक घेऊन बहिष्कार उठविण्याचे आवाहन केलं. त्याला सवर्णांनी तोंडदेखला होकार भरला. पूर्वीइतका नाही, पण काही प्रमाणात का होईना बहिष्कार राहिलाच. शेतीत मजुरीचं काम आधी इतरांना द्यायचं, फारच गरज पडली तर दलितांना बोलवायचं. एकाही दलिताला उधारीवर माल द्यायचा नाही... अशा पद्धतीने कोंडी चालूच होती.
 ही कोंडी फुटावी कशी? हा प्रश्न किसनभाऊंना व प्रज्ञाला पडायचा. त्यांची खलबतं, चर्चा व्हायची. कारण मुळातच गावात भीषण पाणीटंचाई होती व पाटलान आपली खाजगी विहीर शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करू नये म्हणून कोर्टाचा स्टे आणला होता. तिथं आता कुणाला हक्कानं पाणी भरता येत नव्हत. पाटलांच्या मर्जीनं आजही सवर्णांना पाणी मिळायचं, पण दलितांना व विशेषतः नवबौद्धांना तो स्टे दाखवायचा व साळसदपणे नकार द्यायचा. त्यामुळे काही करण अवघड झालं होतं. त्यातूनच ही स्थलांतराची कल्पना पुढे आली. त्यांना निर्णय घेणे कठीण नव्हते. कारण कुणाचीच घरे पक्क्या स्वरूपाची नव्हती. सान्यांचीच काडाची पाल होती, एका दिवसात त्यांनी आपला कटंबकबिला व खटलं या उजाड पठारावरा माळरानावर हलवलं.
 प्रज्ञाला आताही हे सारं क्षणार्धात आठवलं आणि अंगावर काटा आला. केवढी गावधणी लाचारी! केवळ मागास जमातीचा कपाळी शिक्का म्हणून? का त्यातही आपले बांधव शिकत आहेत व मख्य म्हणजे संघर्ष करीत आहेत त्याची ही शिक्षा?

 तिनं एक दीर्घ नि:श्वास टाकला व पंचक्रोशी न्याहाळू लागली. दुपारच्या झगझगत्या उन्हात दूरवरही कोठे टॅकर दिसत नव्हता. तिच्या पोटात भीतीचा गोळा

लक्षदीप ॥ ८७