पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जान, दूसरा कोई तो यहा टॅकर नहीं ला सकता. ये बंदा ही सिर्फ ये काम कर सकता है। उसकी वजह भी सिर्फ तुम हो प्यारी - सिर्फ तुम!"
 त्याची ही सलगी प्रज्ञाला रुचत नसे, पण सहन करावी लागायची. कारण तो त्यांच्या तांड्याला जवळपास बारा महिने टॅकरने पाणी पुरवायचा. या भागात पाणी लागत नाही, असं भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितलं होतं. पर्याय म्हणून एक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित होती, पण अवघ्या सत्तर घरांसाठी एवढी मोठी योजना मंजूर होत नव्हती. तांड्याचे पुढारी किसन रणबावळे पंचायत समिती कार्यालयात खेटे मारून मारून थकले होते.
 तांड्याचं सारं अस्तित्वच मुळी टॅकरच्या पाण्यावर अवलंबून होतं. तरी एक बरं होतं, गतवर्षी नव्यानं बदलून आलेल्या बी. डी. ओ. नं. पाहणी केल्यानंतर टॅकर बारमाही केला होता.
 बी. डी. ओ.च्या त्या भेटीत प्रज्ञानं त्यांना सांगितलं होतं “साहेब, हा तांड्यावर येणारा रस्ता तरी रोजगार हमीतून करून द्या... म्हणजे टॅकर धडपणे वरपर्यंत येत जाईल. नाही तर आज अशी अवस्था आहे की, दो तीन दिवसाला एकदा टेंकर कसाबसा येतो. वर येता येता बिघडतो मग पुन्हा आमची पंचाईत. साहेब, पोटाला भूक दिवसातून दोनदाच लागते, पण या उघड्या माळावर व अशा प्रखर उन्हात पाणी पुन्हा पुन्हा लागतं. भाकरी कमवावी लागते. ती पुरेशी नसते, मग पाणी तरी घोटभर मिळाव साहेब!"
 बी. डी. ओ. अवाक् होऊन तिच्याकडे क्षणभर पाहात पाहिले. मग म्हणाले, बरोबर आहे, बाई तुमचं. मी कायमस्वरूपी पाणीपुरवठा स्कीमचा पाठपुरावा जरूर करतो. मग रोजगार हमीतून रस्ताही प्रस्तावित करतो तहसीलदाराकडे. ब-याच प्रयत्नांनी रस्ता मंजूर झाला होता. पण काम सुरू होऊन अवघ्या आठ दिवसातच ः पडलं होतं. कारण रस्त्याच्या जागी कठीण खडक होता व खडी फोडत रस्त कर जिकिरीचं काम होतं. जवळच बंडिंगचं मेहनतीला कमी असलेलं काम सुरू होतं. तिथे सारे मजूर वळले व हे काम मजूर नसल्यामुळे बंद पडलं.
 प्रज्ञानं तांड्यावरील आपल्या भावाबहिणींना कितीदा तरी विनवलं होतं, "हा रस्ता आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा तांडा इथं कायमस्वरूपी वसावा अस वाटत असेल, तर आपणच हे जिकिरीचं काम केलं पाहिजे. मला माहीत आहे, हे काम अवघड आहे. मजुरीही बंडिंगपेक्षा कमी मिळते. तरीही केलं पाहिजे. निदाने पाण्याचा टॅकर वेळेवर नीटपणे यावा यासाठी हा रस्ता हवा!"

 तिच्या तांड्यावरील नवबौद्ध बांधवांना ते पटत नव्हतं थोडंच? पण सतत मालमजुरी करणाच्या व काळ्या हायब्रीडच्या भाकरीचं भोजन करणा-या हाडात व पाठीशी गेलेल्या पोटानिशी जगणाच्या देहात मेहनतीचं काम करण्याची ताकद उरली

लक्षदीप । ८५