पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असतं. ब-याच वेळी प्रत्यक्ष काम करणा-या मस्टर असिस्टंट किंवा ज्युनियर इंजिनिअर्सकडून वेळेवर अहवाल प्राप्त होत नाही, म्हणून मागच्या आठवड्याचा रिपोर्ट रिपीट केला जातो. इथं हाच प्रकार घडला होता. प्रत्यक्ष काळगाव दिघीत वर्षापासून बंद पडलेलं पाझर तलावाचं काम सुरू झालं होतं. तरीही त्याची माहिती कार्यालयात वेळेवर न आल्यामुळे ते काम बंद असल्याचं साप्ताहिक अहवालात नमूद केलं गेलं. ही माहिती तपासण्याची यंत्रणा तहसीलदाराकडे नसते, त्यामुळे कार्यालयीन यंत्रणेची माहिती ग्राह्य धरून जिल्ह्यात व जिल्ह्यातून शासनाकडे अहवाल पाठवला जातो. । | इथंही नेमकं हेच घडलं होतं. काम चालू असूनही माहिती प्राप्त न झाल्यामुळे ते काम बंद आहे' असे अहवालात नमूद केलं गेलं आणि त्या माहितीच्या आधारे राघूला रांजणीला दूरवर कामावर जाण्यासाठी शिंद्यांनी हुकूम दिला होता. त्याच्या गावात काम सुरू होतं, पण ते कुणालाच माहीत नसल्यामुळे राघूला व त्याच्या बहिणीला रांजणीला बरं नसताना जावं लागलं हेतं. जर काळगाव दिघीचं काम सुरू असल्याचं माहीत झालं असतं, तर राघूच्या बहिणीला सहा किलोमीटर रांजणीला जाण्याचे व परत येण्याचं काम पडलं नसतं व कदाचित तिचा बळीही गेला नसता. त्याच वेळी बंडिंगचे गोसावी आले. त्यांनी राघूनं जी माहिती रांजणीच्या कामाबद्दल सांगितली होती तिला दुजोरा दिला. त्यांचाही काही दोष नव्हता. असेल तर परिस्थितीचा व ठकूबाईच्या गरिबीचा होता. शिंद्याची मात्र घुसमट होत होती. मनोमन ते विलक्षण क्षुब्ध होते. जिवाला तीव्र टोचणी लागून राहिली होती. या भूकबळीला एक शासकीय अधिकारी म्हणून मीच जबाबदार आहे. एका घंट्यामध्ये जीप परत आली. आणि तहसीलदारांच्या चेंबरमध्ये हात जोडीतच शर्मा दुकानदाराने प्रवेश केला, “जय रामजी की!!” त्यांच्यासमवेत गावचे सरपंच होते. । शिंद्यांनी त्यांना चांगलेच फैलावर घेतलं. शर्माला पाहताच त्यांचा सारा क्षोभ व संताप उफाळून आला, “लाज वाटली पाहिजे तुम्हाला शर्माजी, खुशाल आठ-आठ दिवस दुकान बंद ठेवता, मजुरांना कुपनावर धान्य देत नाही. होत नसेल दुकान चालवणं तर राजीनामा द्या!” “रावसाहेब, माझं दुकान बंद नव्हतंच. माझ्या मुनिमाकडे माझ्या गैरहजरीत दुकान चालवण्याचे अधिकारपत्र आहे. मी बालाजीला गेलो असता त्यांनी काळगाव दिघीमध्ये वाटप केलं होतं. पाहिजे तर तुम्ही रेकॉर्ड तपासवा, या सरपंचांना विचारा हुजूर ... आम्ही कधीही दुकान बंद ठेवलेलं नाही. रोज वाटप चालू आहे. राघ कधी दुकानावर आलाच नाही!” लक्षदीप ॥ ८१