पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लोकजीवनाने त्यांना लेखनाचे अनेक विषय दिले आहेत.लेखक म्हणून परिसराशी त्यांची जैव स्वरूपाची गुंतवणूक आहे.

२.

 देशमुख यांनी विविधस्वरूपी वाङ्मयाची निर्मिती केली आहे.कथांजली (१९८७),अंतरीच्या गूढगर्भी (१९९५),उदक (१९९७) (पुढील आवृत्तीचे शीर्षक - पाणी! पाणी! पाणी!),नंबर वन (२००८),अग्निपथ (२०१०) व सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (२०१३) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सलोमी (१९९३),ऑक्टोपस (२००६),अंधेरनगरी (१९९४),होते कुरूप वेडे (१९९७), इन्किलाब विरुद्ध जिहाद (२००४) व हरवलेलं बालपण (२०१४) या त्यांच्या कादंब-या प्रकाशित आहेत.दूरदर्शन हाजीर हो (बालनाट्य, १९९७) व अखेरची रात्र (२०१४) ही त्यांची नाटके प्रकाशित आहेत.याशिवाय प्रशासननामा (२०१३) व बखर प्रशासनाची (२०११) ही त्यांची प्रशासनविषयावरील दोन पुस्तके प्रकाशित आहेत.शिवाय विविध नियतकालिकांतून त्यांनी वैचारिक,सामाजिक व प्रवासवर्णनपर लेखनही केले आहे. त्यांच्या काही कथांवर चित्रपटनिर्मिती होते आहे.

३.

 १९६५-६६ दरम्यान बालवयात साधना साप्ताहिकातील एका बालकथेने त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली.पुढे काही रहस्यकथाही त्यांनी लिहिल्या.कथासाहित्यप्रकारात देशमुख यांनी विविधस्वरूपी लेखन केले आहे.'अंतरीच्या गूढगर्भी'पासून ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' असे त्यांचे सहा कथासंग्रह प्रकाशित आहेत.आरंभीच्या कथालेखनावर रोमँटिक आदर्शवादाची छाया आहे. कथांजली व अंतरीच्या गूढगर्भी या संग्रहातील कथाविश्व मध्यमवर्गीय भावविश्वाशी संबंधित आहे. स्त्रीपुरुष नात्यांचा शोध,मानवी वर्तनातील काही तणावांचे चित्र या कथाचित्रणात आहे.पुढे मात्र समस्याकेंद्री कथामालिका त्यांनी लिहिल्या.समकाळात भेडसावणाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.एका आशयसूत्राच्या विविध परी चित्रित करण्याचा हा प्रयत्न केला आहे.पाणीसमस्या,खेळाडूंचे भावविश्व व स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न या जीवनाधारित कथांचे संग्रह पुढील काळात प्रसिद्ध झाले.एकेक प्रश्न घेऊन त्या प्रश्नांचे विविध कंगोरे धुंडाळण्याची ही रीत आहे.'थीमबेस्ड कथा' असे त्यांना म्हटले आहे.सामाजिक समस्यांचे चित्रण करणाच्या या महत्त्वाच्या कथामाला आहेत.

 या संग्रहात ‘मर्सी किलिंग' ही वेगळ्या विषयावरची कथा आहे.प्रियू नावाच्या कुटुंबवत्सल स्त्रीला मुलगा होतो.तो केवळ शरीराने वाढतो.मेंदू व बुद्धीने वाढ न होणारा तो मांसाचा गोळा होता. आपल्यानंतर त्याचे कसे होईल या भावनेने ती

लक्षदीप । ७