पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिद्यांनी पाहिलं, विसपुते आले होते. त्यांचं अभिवादन स्वीकारून त्यांना बसायला सांगितलं. मी आज तुम्हाला भेटणार होतोच. पण तुमचं पकड वॉरंट आलं शिपायामार्फत म्हणा ना, मग काय करता? तसाच आलो... झालं!' आणि विसपुते गडगडाटी हसले. तसं कारण काहीही नव्हतं, पण शिंद्यांना विसपुते हा पहिल्यापासूनच आवडला नव्हता. त्याचं अघळपघळ बोलणं, गडगडाटी हसणं आणि त्याचे मांजरासारखे हिरवेघारे डोळे, सारंच त्यांना खटकायचं. वाटायचं, हा ज्या शेतकरी व शेतमजूर संघटनेचे काम करतोय, तिथं हा शोभत नाही. हा ती संघटना आपल्या पुढारीपणासाठी वापरतोय. त्याला शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांशी काही देणं-घेणं नाही. खरं तर हा त्यांचा स्वत:चा, व्यक्ती पाहून झालेला ग्रह होता. त्याला काही ठोस आधार वा पुरावा नव्हता. | पण आज मात्र शिंद्यांची खात्रीच झाली की, आपला हा ग्रह चुकीचा नाही. कारण आज त्यांना आपण का बोलावलं आहे हे माहीत असणारंय. तरीही ते गडगडाटी हसत होते... कारण नसताना व विनोदाचे प्रयोजनही नसताना. आपल्या पंचायतीमार्फत काम मागण्यासाठी अर्ज केलेल्या राघूच्या बहिणीचा भूकबळी झाल्याची वार्ता आलीय पेपरमध्ये. तुम्हाला काही माहीत आहे त्याबद्दल.....?! “वा! माहीत तर आहे. अहो, कालच मला पेपरचा वार्ताहर किनाळकर भेटला होता. त्याला मीच सांगितलं हे! तसंच राघूही होता माझ्या बरोबर-! “विसपुते..!' तीव्र स्वरात शिंदे म्हणाले, “हे.... हे मला सांगता आलं नसतं तुम्हाला? मी कधी तुमची भेट चुकवली आहे? किंवा सांगितलेल्या कामासंबंधी कार्यवाही केली नाही? तरीही...." “त्याच असं आहे रावसाहेब. गेले दोन दिवस तुम्ही सतत दौ-यावर होता साक्षरता अभियानाच्या कामासाठी. मग कशी भेट व्हायची?” विसपुते म्हणाले, अहो, इथे दुष्काळात लोकांचे हाल आहेत आणि शासनाला हे काहीतरीच खूळ सुचतंय.... आधी हातात काम द्या, पोटाला भाकरी द्या व मग त्यांना शिकवा. आपल्याला विसपुत्यांनी आधी का कळवलं नाही हे खोलात जाऊन विचारण्यात आता काही अर्थ नव्हता व त्यांचा साक्षरता अभियानावरील रागही त्यांना माहीत होता. | "ठीक आहे. पण मी त्यांना रांजणीच्या नालाबंडिंगच्या कामावर पाठवलं होतं. ‘त्याचं असं झालं साहेब....' जरा पुढे सरसावत विसपुते म्हणाले, “इथे माझ्या सोबत राघू आहे. तो बाहेर उभा आहे, तोच तुम्हाला सांगेल.' राघ जेव्हा त्यांच्यासमोर आला, शिंद्याच्या मनात एक अपराधी भाव चमकून गेला. आपण याच्या बहिणीच्या भूकबळीला जबाबदार आहोत, असं त्यांना वाटत लक्षदीप ॥ ७३