पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मृत्युमुखी पडली होती व ही वार्ता खरी असेल तर तो भूकबळी ठरणार होता. ही शिंद्यांसाठी वैयक्तिक व तालुक्याचा तहसीलदार म्हणून नामुष्की होती. विचार करूनही त्यांना आपण कुणाला कामाला नाही म्हणाल्याचं आठवत नव्हतं. पुन्हा पुन्हा ते आपली डायरी चाळत होते, पण अवघ्या एकशेवीस गावांच्या तालुक्यात आजमितीला पंचाहत्तर कामं चालू होती, तरीही काळगाव दिघीची एक महिला काम नसल्यामुळे उपासमारीनं मृत्युमुखी पडली होती! | शिंदे काहीसे भावनाप्रधान होते, त्यामुळे भूकबळीची बातमी त्यांना अस्वस्थ करून गेली होती. वृत्तपत्रातून किंवा व्हिडिओ मॅगेझिनवर त्यांनी कलहांडी वा बिहारमधील उपासमारीच्या बातम्या ऐकल्या-पाहिल्या होत्या. सध्या तर सोमालिया देशातील भुकेची तीव्रता टी. व्ही द्वारे अनुभवली होती. ती भुकेने चिपाड झालेली व सारी भूक डोळ्यात व सुन्न नजरेत सामावणारी काळी मुले पाहून त्या रात्री त्यांना जेवणही गेलं नव्हतं. रेणुकेनं टी. व्ही. बंद करून म्हटलं होतं, “कान्त, एवढा काय ते मनाला लावून घ्यायचं? तुम्ही तर पुरुष आहात. मन घट्ट हवं. पुन्हा ज्या खात्यात नोकरी करता तिथं दुष्काळाशी घडोघडी सामना करावा लागतोय. हा तालुका त्याबाबत अग्रेसर आहे. अशा वेळी काम करताना मन शांत ठेवायला हवं...!" तरीही त्यांची अस्वस्थता कमी झाली नव्हती. त्यानंतर टीव्हीवर किंवा ‘द वर्ल्ड धिस वीक' हा कार्यक्रम पाहाताना सोमालियाची बातमी आली की ते टीव्ही सरळ बंद करायचे. “खरंच रेणू, मला कळतं की हा पळपुटेपणा आहे. मी नाही पाहू शकत, सहन करू शकत ती नजरेतली भूक आणि जीवघेणी सुन्नता त्या लोकांची. आपण अशा वेळी सुस्थितीत आहोत, पोटात रोज गरम अन्न जातं, याची लाज वाटते. पण ती वांझोटी असते... | तालुक्यात दुष्काळाशी सामना करताना उजाड खेडी, शुष्क रखरखीत प्रदेश पाहून त्यांना आपली सुस्थिती ही वाळवंटातील ओअॅसिसप्रमाणे वाटायची व ती मन विदीर्ण करून जायची. त्यामुळेच की काय, ते अधिक तडफेनं व जिद्दीनं दुष्काळावर मात करण्याच्या विचारानं प्रेरित होऊन काम करायचे. पण यातला तोकडेपणा व मर्यादा त्यांना प्रकर्षाने जाणवायच्या. अजस्र पसरलेल्या प्रशासनातले तहसीलदार म्हणून ते फार छोटे होते, जे त्यांच्यापेक्षा मोठ्या चक्रात व त्यांच्यापेक्षा लहान चक्रात गुंफले गेले होते; त्यामुळे स्वत:ची गती राखता येत नव्हती. तसंच दुष्काळ पडला की रँकरने पाणी द्यायचं, रोजगार हमीचं काम पुरवायचं, धान्य द्यायचं, हे उपाय दुष्काळाची तीव्रता कमी जरूर करणारे आहेत. पण त्यामुळे तो कायमचा हटत नव्हता. बहात्तरचा दुष्काळ ते फक्त ऐकून होते, पण त्यामानाने तीव्रता कमी आहे, असं अर्थशास्त्राचे विद्यार्थी असलेले शिंदे अनुमान जरूर काढ़ लक्षदीप । ७१