पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गजराला अभिमान वाटायचा. जाणवायचं की, एक मजूर म्हणून याच्या उभारणीत माझेही श्रम सामील आहेत! जेव्हा तो पूर्ण होऊन पाणी अडवलं जाईल, तेव्हा या गावची बरीच जमीन बागायती होईल, विहिरींना पाणी वाढेल. हळहळ एकच होती, बँकेनं लिलावात जो पाच एकराचा तुकडा विकला होता, तोही बागायत होत होता. पण आता त्याचा धनी वेगळा होता.
 त्यांच्या गप्पा रंगत असताना मुकादम त्यांच्या समोरून गेला, पण त्यानं गजराकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं. इतर चार बाईमाणसांप्रमाणेच ती एक. त्याच्या लुबच्या नजरेचा तिला तिटकारा होता, त्यामुळे त्याचं आजचं झालेलं दुर्लक्ष तिला दिलासा देऊन गेलं... पण ते क्षणभरच.
 दुस-याच क्षणी सकाळपासून मनात उठलेल्या पिसाट विचारांना पुन्हा एकदा चालना मिळाली आणि ती मनस्वी घायाळ झाली....
 हा मुकादम जेव्हा गजरा प्रथमच या कामावर आली, तेव्हा कसा डोळे फाडून फाड़नआरपार पाहात होता. ती किती भेदरली होती! अशा परक्या पुरुषाच्या नजरेचा तिला अजिबात सवय नव्हती. हा आपला घाटदार देह, हणमंताच्या अभिलाषेचा विषय, एका परपुरुषाच्या नजरेत वासना पेरतो व लाळ गाळायला प्रवृत्त करतो याचा तिला विषाद वाटला, पण त्याकडे दुर्लक्ष करून ती काम करीत राहिली होती!
 त्या रात्री किती वेळ तरी ती हणमंताच्या कुशीत हमसून रडत होती. 'धना, हा काय पाळी आणली वो तुमी माझ्यावर?”
 "खरं सांगू गजरा, तुझं हे आजचं कामावर जाणं मला पसंद नव्हतं. मी तुला कालच म्हणलं होतं - ही आपली कामं नव्हेत. काही झालं तरी इनामदाराच धरा आपलं!'
 "त नगा सागू मला - घरात व्यंक - आपलं एकुलतं एक पोर भुकेनं रडतंय... त्याचं बोला..."
 "मी आज - उद्या काहीतरी बंदोबस्त करतो पैशाचा - साले. सर्वजण चोर आहेत. एवढे त्यांच्यावर उपकार केले, पण वेळेला एकही मदत करीत नाही.”
 "धनी, संकट का एखाद्यावर आलं आहे? सायांनाच या दुष्काळाचा तडाखा बसला आहे. सा-यांचेच हे हाल आहेत."
 क्षणभर गजरा घुटमळली, बोलायचं धाडस होत नव्हतं. तरी पण चाचा एकवटून म्हणाली “जो मार्ग मी पत्करलाय, तो नाही तुम्हला जमणार? जोडीन कामावर जाऊ रोजगार हमीच्या, अनेकजण तसे येतात. रोज तीन किलो धान्य मिळेल कुपनावर - हप्त्याला शंभरसव्वाशे रुपये पण मिळतील...."

 काय म्हणतास? मी तुझ्यासंग रोजगार हमीच्या कामाला येऊ? यडी का। खुळी? हा इनामदार, चव्हाणाच्या खानदानीचा, मजूर म्हणून काम करील? छट्, ते

६२ ■ लक्षदीप