पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. तो अस्पष्ट व क्षणजीवी असला तरी...
 अशाही परिस्थितीत तुला माझी करायची. आणि हे करताना तुला तर ही जाणीव द्यायची नाही की, हे मला खटकतंय - कुठे तरी डाचतंय...
 मी आपणहून सरांकडे जया मागितली आणि तिचीही ‘ना' नव्हती. आता मला माघार घेणं शक्य नव्हतं.
 जयानं पत्रात शेवटी लिहिलं होतं -
 “तू पूर्णपणे विचार कर आणि इत:परही मला आपली करणार असशील तर तार कर. आणि नंतर मकरंद प्रकरणात एक शब्दानेही मला कधी विचारायचं नाही."
 “आता पत्र लिहिताना, विचार करताना जाणवतं, मला तूही आवडत होतास. तेव्हा मी किशोरी होते, थोडी पोरकटही होते. पण तुझंही माझ्या जीवनात तेव्हा पण काही एक स्थान होतं हे नक्की आणि विवाहानंतर मी सर्वस्वानं तुझी होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे, एवढं प्रॉमिस मी आज देते..."
 स्वत:च्या मनावर लगाम घालीत मी तिला तिच्या पत्राप्रमाणे तार केली.
 एका शुभ मुहूर्तावर जया माझी झाली...
 'जया माझी झाली,' असं मी म्हणतो, पण खरंच ती सर्वस्वानं माझी झाली का? हा प्रश्न माझ्यातल्या मत्सरी पुरुषाला अनेकदा पडायचा. त्याच्या प्रत्युतरा- दाखल माझं दुसरं मन वाद करायचं - सर्वस्वानं दुस-याचं होणं हे कितपत शक्य आहे: प्रेमातलं, जीवनातलं अद्वैत हे खरं आहे का?
 तिच्याशी रत असताना कधी कधी मला वाटायचं आमच्यात एक अदृश्य छ आहे. ती मकरंदची आहे...
 हे सारे माझ्या मनाचे खेळ होते. स्वत:ची मला अशा वेळी अक्षरशः चीड यायची. मी माझी शतश: निर्भर्त्सना करायचो.
 पत्रात प्रॉमिस केल्याप्रमाणं जया माझी होऊन राहात होता. मी सुखाः तृप्तीच्या परमोच्च शिखरावर होतो. पण या सुखाला कुरतडणारा एक व्यय ९l": " तृप्तीला मत्सराची झालर होती.
 जया मकरंदला विसरली का? तिला आठवत नसेल का? तिच्याही मनात माझ्याशी प्रणयक्रीडा करताना कधी तरी तो आठवत असले का ?
 तिला दुखवण मला कधीच शक्य नव्हतं. म्हणन पत्रात कबल केल्याप्रमाणे कधीही मी तिला चुकून मकरंदबद्दल विचारलं नाही.
 मग आत्ताच एकाएकी हे मी काय केलं? ते पत्र मी कोणत्या भावनेने लिहिलं जयाला?

 मी स्वत:शी विचार करीत होतो. बसच्या वेगाची लय माझ्या विचारचक्रानं पकडली होती.

लक्षदीप । ५५