पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/469

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘लक्षदीप' हा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या निवडक साहित्याची संपादित संग्रह. या संग्रहात त्यांच्या कथा, नाटक, आत्मपर, प्रवासवर्णन, प्रशासनविषयक, वैचारिक वे आस्वादसमीक्षा या लेखनप्रकारांतील लेखनाचा समावेश केला आहे.
 लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या ' जीवनानुभवाच्या प्रकटीकरणासाठी विविध लेखनप्रकारांची रीत अवलंबिली आहे. कथात्म साहित्यप्रकारातून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली आहे. अनेक नवे विषय त्यांच्या कथांमधून आविष्कृत झाले आहेत. समस्याग्रंथान कथा म्हणून या कथेला विशेष महत्त्व आहे. खेळाडूंच्या संघर्षकथा, पाणीप्रश्न व स्त्रीभ्रूणहत्या यांसारख्या विषयांवर त्यांनी कथामालिका लिहिल्या, थीमबेस्ड कथा म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या कादंब्यांमधून विविध प्रकारची जाणीवसूत्रे व्यक्त झाली आहेत. बालमजुरांचे दाहक प्रश्न, राजकारण व मानवी जीवनाची विशिष्ट दर्शनबिंदूतून केलेली । चित्रणे आहेत. त्यांच्या एकूण लेखनात मुस्लिम संस्कृतीचे जीवनेरंग सहिष्णुतेच्या भावनेने समजून घेण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनविषयक लेखनातून भारतीय प्रशासनाची वाटचाल, तीमधील स्थित्यंतरे वै : । स्थकथने साकारली आहेत. प्रवासवर्णन व कलामीमांसाविषयक .. लेखनातून देशमुखांच्या जिव्हाळ्याचे विषय व त्यासंबंधीचा त्यांचा दृष्टिकोन व्यक्त झाला आहे.
 विविध पातळ्यांवरील राजकारणाचा व समाजकारणांची चित्रणफलक त्यांच्या सर्वच साहित्यात आहे. प्रशासनव्यवहारातील गुंत्यांचे विविधलक्ष्यी चित्रण हा त्यांच्या एकूण साहित्याची विशेष आहे. :- ऐशीनंतरच्या काळातील महाराष्ट्रीय समाजातील प्रशासकीय जीवनाचे वृत्तांत त्यांच्या साहित्यात आहेत. देशमुख यांच्या एकूण संवेदनशील स्वभावावर प्रशासकीय जीवनानुभवाचा व आदर्शवादी भूमिकेचा प्रभाव आहे.

- डॉ. रणधीर शिंदे


दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
२५१ क, शनिवार पेठ, पुणे -४११०३०