पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/468

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेखक परिचय लक्ष्मीकांत वसंत देशमुख शिक्षण : एम.एस्सी., एम.ए. (मराठी साहित्य), एम.बी.ए., आयआयएम बेंगलोर प्रशासकीय कारकीर्द : १९८३ उपजिल्हाधिकारी, २००२ मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नती, २००९ ते २०१२ जिल्हाधिकारी, कोल्हापूर जून; २०१२ पासून व्यवस्थापकीय संचालक- महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ पुरस्कार : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे; आपटे वाचन मंदिर, इचलकरंजा; अच्युत बन पुरस्कार, नांदेड; वाङ्मय चर्चा, बेळगाव; नगर वाचनालय कादंबरी पुरस्कार, अहमदनगर; राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार महत्त्वाचे पुरस्कार : नॅसकॉम सोशल ऑनर पुरस्कार' (२०१०), मथन २०११ दक्षिण आशियाई पुरस्कार । प्रकाशित पुस्तके : कादंबरी : सलोमी. अंधेरनगरी, ऑक्टोपस, होते करूप वेडे, इन्किलाब विरुद्ध जिहाद कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गुढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, अग्निपथ, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कार) संकीर्ण : दूरदर्शन हाजीर हो! (बालनाट्य), मराठवाडा मुक्तिसंग्राम (संपादित), बखर भारतीय प्रशासनाची- प्रशासननामा (वैचारिक) इंग्रजी साहित्य : The Real Hero & other stories सामाजिक कार्य : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष (१९९५), ‘अक्षर प्रतिष्ठा’- परभणी या साहित्यविचार व्यासपीठाची स्थापना, कोल्हापूर येथे शाहू स्मारकाचे पुनरुज्जीवन व विस्तार, व्याख्यानमाला, साहित्यिक गोष्टी व जिल्हा संमेलनाचे आयोजन, ‘अक्षर अयान' या नावाचा दिवाळी अंकाचे संपादन (२०१३), मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून निवड लक्षदीप ॥ ४६७