पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/466

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लो आज हमने तोड़ दिया, रिश्ता-ए-उम्मीद
लो अब कभी गिला न करेंगे, किसीसे हम ।।'

 ‘प्यासा' मधील ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?' असंच गुरुदत्तला उत्तरआयुष्यात वाटत आलं असणारं. त्याचं कारण होतं,

‘हरेक जिस्म घायल, हरेक रुह प्यासी
निगाहों में उलझन, दिलों में उदासी
ये दुनिया हैं या आलम में बदहवासी
ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है?'

 गुरूची अस्वस्थता पण अश्वत्थाम्याच्या चिरंतन चरत जाणाच्या जखमेसारखी अविनाशी आहे व ती सिंदबादच्या भुताप्रमाणे संवेदनक्षम माणसाच्या मानगुटीवर केव्हा बसेल हे कळणार नाही... पण आजच्या मुर्दाड शारीरमांद्याच्या उपभोगी दुनियेत असं पछाडणं कुणाच्या वाट्यास आलं तर किती बरं होईल!

०-०-०

लक्षदीप ■ ४६५