पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणूस म्हणून त्याच्या अनाकलनीय, अॅबस्टॅक्ट चित्राप्रमाणे थोडसं समजणारं, पण खूपसं काही न कळणारं पण मनस्वी भावणा-या - अक्षरश: पछाडणाच्या मनाबद्दल त्याच्या मृत्यूनंतर स्फुट लेखाखेरीज फारसं काही लिहिलं गेलं नाही.
 मला या इथे लेखात त्याच्या अस्वस्थतेचा व त्याच्या कमालीच्या कॉम्प्लेक्स मनाचा तुकड्यातुकड्यानं त्यावर एक्सरेप्रमाणे सत्याचे, अनुभवाचे काही झोत टाकायचे आहेत व या तुकड्या-तुकड्या सत्याचा एक कॅलिडोस्कोप करता येतो का याचा मला इथं प्रयत्न करायचा आहे.
 राज कपूर एकदा गुरुदत्तच्या संदर्भात वरकरणी गंमतीमध्ये एक फार मोलाचं विधान करून गेला होता. 'Gurudatta is so sensitive that he should carry a lable on his heart : Fragile, handle with care.' एका मर्यादेपर्यंत मित्र म्हणून त्याचं हृदय-त्याचं मन अब्रार अल्वी व व्ही. के. मूर्तीनं सांभाळलं; पण ज्या दोघीत तो अडकित्त्यातील दोन पात्यांमध्ये सुपारी जशी कातरली जाते, तसा तो गीता व वहिदाच्या प्रेम व नंतर दिलेल्या अंतरायात काचला गेला होता. सावळ्या-सलोन्या बांगला गीताचं सौंदर्य आणि वहिदाचं क्लासिक खानदानी मुस्लीम सौंदर्य. कुणीही व्यक्ती त्यापासून स्वत:चा बचाव करू शकला नसता. पण गुरूचं दुदैवं की, हा दान बेमिसाल सौंदर्य त्याच्या जीवनात आली व त्याचं हृदय पुन्हा पुन्हा भंग करून गला.राज कपूरनं म्हणल्यामुळे त्याचं 'Fragile' व तीव्र संवेदनशील मन-हृदय त्यांना जपायला हवं होतं - पण दोघीचं स्त्रीत्व व आत्मसन्मान प्रखर होता, त्यांना प्रेमात तडजोड करीत कदाचित दुसरीला सामावून घेणं ज्वलंत स्त्रीत्वामुळे शक्य झाले नसावं. वहिदा जीवनातून दूर झाली, तर गीता घर-संसार सोडून अलग राहू लागला.गुरुदत्त फ्लॅटमध्ये किंवा स्टुडिओमधील विसाव्याच्या बेडरूमध्ये एकाकी राहायचा.१९६३-६४ च्या काळात बहुतांश रात्री त्यानं एकट्यानं व्यतीत केल्या होत्या. त्या रात्रींनी त्याचं नि:शब्द धुमसणं, आक्रंदन आणि शून्यात स्वत:ला हरपून गेलेला गुरू किती वेळा पाहिला असेल? त्याही त्यामुळे उदास व खिन्न झाल्या असतील. त्यांना पण का त्यानं मृत्यला जवळ केल्यावर सटकेचा श्वास टाकला असेल? त्याच कोमल व वारंवार छिन्न भिन्न होणारं हृदय अखेरीस धडधण्याचं थांबून शांत झाले म्हणून का त्या एकाकी रात्रीचा तो सुटकेचा नि:श्वास होता?

 व्ही. के. मर्तीने जेव्हा बेंगलोरला कायम रहायला जायचं ठरवलं तव्हा गुरुप व त्याला अब्रारला म्हणाला होता, मी आता अनाथ, पोरका, एकाकी होणार. घरखा नही हैं, गीता अलग झाली होती. आणि वहिदा जीवनातन निघून गेला होता, पुस बेंगलोर जा रहे हो. और अब्रार फिल्म लिखने के लिए मद्रास. क्या करू में? गुरू जेवढा एकांती होता, तेवढाच लोकांती होता. त्याला त्याच्या जीवनात आलेल्या स्त्रिया, मित्र, सहकारी कलावंत त्याच्यापासून अलग झालेले सहन व्हायच नाहीत.

लक्षदीप ■ ४६१