पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. गुरुदत्त


'परफेक्ट शॉट विरुद्ध इनपरफेक्ट लाईफ'
या द्वंदात कातरत गेलेला कलावंत - गुरुदत्त

 'Sometimes when I got too tired after work, I become silent and moody. Though my work is dear to me yet I feel I have nothing else in life to hold on to... The more I see life the more bitter I am becoming. And I have less faith in people and human nature.'
 २२ फेब्रुवारी १९५८ सालचं पत्नी गीता दत्तला लिहिलेलं पत्र आज वाचताना वाटतं की, एव्हाना त्याची स्वनाशाकडे (self destruction) वाटचाल सुरू झाला असावी.
 कारण याच काळाच्या मागेपुढे गीता व वहिदा रहेमान त्याच्या जीवनातून प्रत्यक्ष कदाचित नसतील, पण मनानं दूर जाऊ लागल्या होत्या वा गेल्या असाव्यात... गीता दत्तशी त्याचा प्रेमविवाह. पण दोघे एकत्रही राहू शकत नव्हते व दूर अलग जाऊनही त्यांना मनोस्वास्थ मिळत नसे. आणि त्याचं वहिदाचं नातं हे आजही गूढ, उदास पण मन हळवं करणाच्या मनस्वी प्रेमकवितेप्रमाणे आहे... थोडंसं कळतं असं वाटतं, पण बरचसं कळत नाही - अगम्य राहातं. त्याला दोघी हव्या होत्या, एकाच वेळी दोघा हव्या होत्या व एकीला सोडून दुसरी नको होती, असं माझं गुरुदत्तचं मन व व्यक्तिमत्त्व जाणताना त्याचे वर नमूद केल्याप्रमाणे विचार, त्याचे काही उद्गार व त्याच्यावर त्याचे जवळचे मित्र देवानंद व राज कपूरनं व्यक्त केलेली मते, अव्रार अल्वी या त्याच्या सिनेमाच्या पटकथाकार असलेल्या मित्राचं वहिदा संदभतिल सूचक मौन, व्ही. के. मूर्ती या कॅमेरामन मित्राची गुरूच्या मृत्यूनंतरची मुलाखत या साच्याच मानसशास्त्रीय पद्धतीने व त्याहून जास्त एक लेखक म्हणून गुरू नामक प्रतिभावंतालाही मोह पाडणाच्या व्यक्तिमत्त्वाचा मी शोध घेताना गवसलेलं माझ्यापुरत है कलानिक सत्य आहे.

 दुसरं कलात्मक सत्य मला गवसलेलं आहे की, त्याला जीवनाचं व स्वत:चहा

लक्षदीप ■ ४५९