पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रभावी व नेमकं सहजतेनं भाष्य करतो...
 मरण व अंत्यसंस्कार ही गंभीर बाब आहे; पण ज्यांचा हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, ते त्यातूनही जीवनाची छोटी छोटी सुखं कशी शोधतात, हे पाहिलं की जाणवतं - हा खरा एतद्देशीय ‘ब्लॅक ह्यमुर' आहे, जो यापूर्वी ‘गाभ्रीचा पाऊस मध्येही आला होता. 'धग' मधला एक प्रसंग म्हणजे - प्रेताची राख झाल्यावर मेलेल्या माणसाचा एक दात सोन्याचा होता, हे लक्षात ठेवून राखेतून किस्ना हुडकून काढताय... ‘लई गुणाचं पोर' असं कौतुकभरल्या नजरेत पाहात आई त्याला प्रेमानं जवळ घेतेय.किंवा प्रेताला अग्नी दिल्यानंतर कवटी फुटेपर्यंत वाट पाहाताना चहा-पाण्यासाठी पन्नास रुपये दिले असताना लवकरच अल्लदपणे दगड मारून कवटी फुटल्याचा आवाज करीत नातेवाईकांना ‘आता थांबू नका इथं, आत्मा तुम्हाला धरेल' अशी भीती घालून पिटाळून दिल्यावर पूर्ण कुटुंबानं चहा भुरकून पिणं किंवा कुणी तरी मेल्याचा बातमी कळताच कमाईच्या आशेनं पूर्ण कुटुंबात चैतन्य संचारणं, पण मेलेला माणूस मुसलमान आहे व त्याला पुरलं जाणार आहे, हे कळताच उत्साह गळून पडण... है प्रसंग पाहताना अंगावर सर्रकन काटा येतो.
 या चित्रपटाचा प्रभाव माझ्या मते, त्याच्या ‘रॉनेस'मध्ये आहे. असंही माणसाच जगणं मृत्यूच्या छायेत फुलत असतं, याची प्रत्ययकारी रीतीनं जाणीव 'धग' करून देता!
 हिंदू धर्मातले अंत्यविधीचे कर्मकांड असे भीषण व ओंगळ का आहेत हा प्रश्न मला नेहमीच सतावतो. पण त्यात जरापण बदल मागील शतकभरात झालेला नाही,हेही रोकडं वास्तव आहे. याचं कारण माझ्या मते असं असावं की, जवळच्या माणसाच्या मृत्यूनं माणूस आधीच दु:खी, विकल झालेला असतो. पुन्हा मनावर ठसलेल्या संस्कारानं मृत्यूनंतरच्या जीवनाची भीती कुठे तरी सुप्त मनात असत.अशावेळी मन, विवेक व बुद्धिवाद बाजूस सारतं व कर्मकांडाला शरण जात... याच्या उलट इस्लाम व ख्रिस्ती धर्मात प्रेताला पुरलं जातं. ज्या मातीतून जन्म झाला त्या मातीशी - जणू मातेशी - या क्रियेत एकरूप होता येतं! ख्रिस्ती धर्मात शवपेटिकत प्रेत ठेवून खड्ड्यात सोडलं जातं व प्रत्येकामार्फत एक-एक मूठ माती टाकली जात. येथेही थोडेफार कर्मकांड आहे. पण ते सुसह्य व देखणे आहे. अशी सुसह्यता हिंदू धर्माच्या अंत्यविधीत का आणू नये? विद्युतदाहिनी हा चांगला पर्याय आहे, पण ती अजूनही बहसंख्याकांच्या पचनी पडलेला दिसत नाही. मोठ्या नेत्यांच्या चदनाच्या चितेवरील अंत्यविधीचे टीव्हीवरील थेट होणाच्या प्रक्षेपणामुळे त्यातले गांभीर्य कमा होतं. तेथेही 'शो-बिझ' प्रकार वाढताना दिसत आहे. ते मला मनस्वी खटकत, हे मात्र मी स्पष्टपणे नमूद करतो. पुन्हा अनेक शहरांत - गावे सोडा - विद्युत वा डिझल वाहिनीची सोयच नाही. असो.

 मला ‘धग' प्रभावित करून गेला तो माझ्या ख-याखु-या भारतातील एका

लक्षदीप ■ ४५७