पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे की, दोन्ही नाटके नाट्यपूर्ण असून त्यात द्वंद्व मांडलं आहे. 'ब्रोकन इमेजेस' मध्ये मौलिकता विरुद्ध चौर्यकर्म केलेलं साहित्य आणि इंग्रजीविरुद्ध देशी वाङ्मय तर ‘फ्लॉवर्स'मध्ये प्रेम (स्त्री) विरुद्ध कर्तव्य (पुजारीपणा) असं द्वंद्व कार्नाडांनी रंगवलं आहे. या दोन नाटकाद्वारे त्यांनी आपली प्रयोगशीलता व आधुनिक रंगमंचीय नाटके आपण लिहू शकतो हे त्यांनी सिद्ध केलं आहे.
 २००८ सालचं त्यांचं ‘वेडिंग आल्बम' हे नाटक रंगभूमीवर आलं ते आजच्या काळातील कुटुंब व्यवस्थेवरचं सटीक भाष्य करणारं व कथानकापेक्षा एपिसोडिक पद्धतीनं अनेक पात्रांचं जीवननाट्य घडवणारं नाटक आहे. It gives humorous insight into the country's traditions and culture...explore the traditional Indian wedding in a globalized and technologically advanced India!
 हे नाटक म्हणजे शहरी मध्यमवर्गीय सारस्वत ब्राह्मण नाडकर्णी कुटुंबाचा धारवाड शहरातली कथा आहे. हेमा ही मोठी विवाहित मुलगी ऑस्ट्रेलियात नवच्यासह राहणारी; धाकट्या बहिणीच्या, विदुलाच्या लग्नासाठी धारवाडला आली आहे. तिचा भाऊ रोहित हा सॉफ्टवेअर इंजिनियर, प्रेमळ आई व स्वयंपाकीण राधाबाई व कुटुंबप्रमुख नाडकर्णी ही प्रमुख पात्रे. नऊ प्रसंगातून साकारलेलं हे नाटक प्रामुख्यान स्त्री केंद्रित आहे व दोन भिन्न जग-पारंपरिक व आधुनिक (सायबरसह) जगात फिरणार आहे. आधुनिक हिंदू समारंभामध्ये सेक्स, जात, रूढीवादी तसेच आधुनिक विचारांचा टकराव, नात्यातला स्वार्थीपणा, पावित्र्याच्या परंपरागत कल्पनेचा आग्रह, पाच महत्त्व, आज्ञाधारकता, व अधिकार.... व असे असंख्य मानसिक व भावनिक ताणतणाव अनुभवायला येतात. त्याचंच हलक्याफुलक्या शैलीत कानडाना चित्रण केलं आहे. व्हिडीओवर लग्नाची सी. डी. पाटवणे, सायबर कॅफेमध्ये जाऊन मुलान पोर्नोग्राफी चित्र पाहाणे, टी. व्ही मालिकेत भडकपणा आणण्याचा आग्रह धरण, एन. आर. आय. नवरा, त्याचा मुलीवर येणार ताण, वयात आलेल्या किशोर मुलाला विवाहित स्त्रीचं वाटणारं लैंगिक आकर्षण, विदुलाच्या जन्मदाखल्यात बापाएवजी काकाचं नाव असल्याचं लग्नाच्या वेळी समजताच लग्नसंस्थेवर होणारे संशय पावित्र्यावरून होणारे आघात... वाढता धर्मवाद, असे असंख्य स्नॅपशॉट्स काना प्रवाहीपणे नाटकात मांडतात. त्यानं प्रेक्षक अंतर्मुख होतो.

 गिरीश कर्नाडांचं ताजं नाटक म्हणजे “बेंडा कातु ऑन टोस्ट' हे बदलत्या महानगराचं व्यवच्छेदक चित्र होय, ते मराठी पण्यावर बेतन ‘उणे पर शहर एक " ‘आसक्त' संस्थेनं सादर केले व त्याच्या प्रयोगास सध्या तरुणवर्ग गदा करती ९: वेगाने बदलणाच्या शहरात ग्रामीण भागातील माणसे व त्यांचे व्यवसाय किना-याच असतात व त्यापेक्षा भिन्न जीवन असतं उच्चभ्र शहरवासीयांचं. यातला विरोधाभास गडद करताना कार्नाड विविध भिन्नवर्गीय पात्रांद्वारे त्याची दाहकता दाखवतात. न

लक्षदीप ■ ४५१