पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐकवणार नाही.” प्रियू किंचाळली. “जा, तुला तुझी काम आहेत. आपला व माझाही वेळ वाया घालवू नकोस!”
 पोस्टमन तिचा हा अवतार पाहताच अलगद तिथून निघून गेला.
 ती पुन्हा आपल्या आरामखुर्चीवर येऊन बसली. पूर्ण खुलास होऊन, आपलं डोकं गच्च दाबून धरलं... छे... मस्तकात जणू घणाचे घाव पडत होते!
 दोन खोल्यांचा तो ब्लॉक या क्षणी तिला फार मोठा व भयाण वाटत होता.
 तिचा बंडू असताना या दोन खोल्या तिला कमी वाटायच्या. कसाही असला तरी तो तिचा होता, तिला प्रिय होता...
 आज तो कुठे आहे? कुठे असेल?
 तो दिवस.. छे, काळरात्र ती.. समोर बंडूचं निष्ण कलेवर होतं आणि झपाटल्यासारखी ती लिहीत होती. मा. नंदूची अखेरची साहस कथा. चित्तथरारक साहसी प्रसंग मालिकेत नंदूचा मृत्यू होतो असं तिनं दाखवलं होतं.. ते बालवाचकांना रुचणार नाही हे माहीत असूनही, कारण त्यांच्यासाठी तिच्या कथा असल्या तरी लिखाणाची खरी प्रेरणा होती - बंडू. तो आज तिला सोडून गेला होता... आता कुणासाठी लिहायची कथा!
 तिला आठवलं, आपण मा. नंदूची पहिली साहसकथा केव्हा वे कशी लिहिली ते...
 सतरा अठरा वर्षांचा बंडू हा फक्त देहानेच वाढला होता, मानसिक वय अद्यापही बाल्यातच रेंगाळत होतं। डॉक्टराचे निदान होतं की, त्याच्या मेंदूवर गभापत्र परिणाम झाल्यामुळे मेंदची वाढच खंटली होती. तो बुद्धीने प्रगल्भ होऊ श" नव्हता....
 शारीरिक दृष्टीने तो पूर्ण फिट होता. पण त्याला दुनियेचं काही एक कळत नव्हतं ! प्रियून आपल्या मायेच्या पदरात... जीवनातील वास्तव संघर्षापासन सदैव जपलं होतं... तो व्यवहाराचे उन्ह साह शकणार नाही हे ती जाणून होती.
 अठरा वर्षांचा बंडू अजूनही म्हणायचा -“आई, गोष्ट सांग ना?”
 कोणती सांगू राजा?"
 "तो राम - पांडवांची नको, परी - राक्षसाची पण ऐकून कंटाळा आला बघ. काही तरी नवीन, वेगळं सांग... एकदम मस्त!" असा बंडूचा सदैव लकडा लागलेला असायचा.
 एकेकाळी लिटरेचरची ती विद्यार्थिनी होती. रघसंगतीच्या प्रियाराधनाच्या काळात उत्कट, हळुवार काव्यरचनाही तिनं केली होती. पण रघूनं तिचा देह लुटून तिला सोडून दिलं.. आणि तिची रसिकता करपून गेली होती...

 ती आग पुन्हा उभारून आली होती. बंडूचं रंजन होईल, त्याला आवडेल अशी

लक्षदीप । ४५