पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/436

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

knowledge, no self realization, only the senselessness of a punishment meted out for an act in which he (Puru) had not been participated. कार्नाडांनी वयाच्या २२ व्या वर्षी म्हणजे १९६०-६१ मध्ये लिहिलेल्या या नाटकाचा इंग्रजी अनुवाद करताना २००८ मध्ये काही प्रमाणात पुर्नलेखन केले. म्हणजे इतरांप्रमाणे त्यांनाही या नाटकातील अनेक नाट्यपूर्ण शक्यता व त्याचे आधुनिक विश्लेषण पन्नास वर्षानंतरही आव्हान देत होते, यापेक्षा या नाटकाच्या अभिजात कालजयीपणाचा दुसरा कोणता पुरावा असून शकेल?
 ‘ययाती' ची आजच्या काळातली प्रस्तुतता ही कार्नाडांनी जबाबदारीच्या संदर्भातून ययातीच्या मिथकाचा नवा अन्वयार्थ लावण्यात आहे. एका अभ्यासकांच्या मते "Karnad restructures the story as ironic drama of discontent, futility and death.' राजा असूनही ययाती शारीरिक सुखाच्या लालसेनं जसा राज्यधर्म आचरत नाही, तसंच आजचा माणूस उपभोगाच्या गर्तेत सापडला आहे, याची जाणीव वाचक प्रेक्षकांच्या मनावर होत जाते व नाटकाला आधुनिक परिमाण मिळतं, ते सार्वत्रिक व कालातीत बनत जाते.
 पुराणकथेमधून बीज घेऊन त्याची कलात्मक पुर्नरचना करीत कार्नाडांनी सादर केलेलं दुसरं नाटक म्हणजे ‘अग्नीवर्षा' (कन्नड अग्नीवर्षा मत्तूमाले किंवा इंग्रजी The fire and The Rain) होय. महाभारतातील वनपर्वामधील यवक्री (यवाकृता) चे उपकथानक या नाटकाचं कथाबीज आहे, पण त्याची कार्नाड त्यांच्या कलात्मक स्टाईलनं मोडतोड करीत त्यातून स्त्री-पुरुष संबंधाची आजची समस्या मांडतात. अपर्णा भार्गव धारवाडकरांनी कार्नाडांच्या Collected Play volume two च्या introduction मध्ये मार्मिकपणे असं नोंदवलं आहे की, 'Karnad reimagines the world of Hindu antiquity and context a story of passion, loss, and sacrifice in the context of vedic ritual; spiritual discipline (tapasya), social and ethical differences between human agents and interrelated forms of performance still close to their monents of origin. या नाटकातला ‘अग्नी' हा शब्द वासना, संताप, सूडबुद्धी, मत्सर, विश्वासघात, हिंसा व मृत्यू सूचित करतो. तर 'वर्षा' हा शब्द स्व-बलिदान, करुणा, दैवी वरदान, क्षमा, पुनर्जीवन, व जीवनाचं महत्त्व अधोरेखित करतो. या नाटकाद्वारे कर्नाड हे सूज्ञपणा व बुद्धीविना ज्ञान, प्रामाणिकपणा - सचोटी विना सत्ता किती भयंकर आहे, हे त्रिकालबाधित सत्य मांडतात. यवाक्रीचं मिथक हेही प्रखरतेनं अधोरेखित करतं की, देवाकडून मानवाला वरदान म्हणून जी दैवी शक्ती मिळते तिचा दुरुपयोग किती विनाशकारी असतो.

 या नाटकाचं कथानक थोडं गुंतागुतीचं आहे. ही कथा आहे रायभ्या व भारद्वाज या दोन कुटुंबाच्या सूड, खून व मत्सराची. अपवाद आहे तो नितीलाई या आदिवासी

लक्षदीप ॥ ४३५