पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/435

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता काही शिल्लक नाही. ते आता तुमच्या जवळ आहे.' ती नवतारुण्य पुन्हा प्राप्त झालेल्या ययातीकडे एक अधिकारसंपन्न पुरुष म्हणून पाहाते आहे व स्वत:ला त्याला समर्पित करू इच्छिते आहे. त्यामुळे हतबुद्ध झालेला ययाती तिच्या अशा पापी व निषिद्ध विचारांबद्दल निर्भत्र्सना करतो. पण तिचे विचार स्पष्ट असतात. ती म्हणते, ‘तुम्ही पुरूचे तारुण्य परत करणार नाही की मला स्वीकारणार नाही. तुमच्या सर्व इच्छापूर्ती झाल्या, पण माझे काय? तुमच्याजवळ तारुण्य आहे, तर पुरूजवळ त्याग केल्याची भावना आहे, पण मी काय करू?' ही तिची धिटाई व स्पष्टवक्तेपणा हा आजच्या संदर्भात स्त्रीवादाला जवळ जाणारा आहे.
 'ययाती'द्वारे कार्नाडांनी पुरुषप्रधान सत्ता व विचारसरणीवर झगझगीत प्रकाशझोत टाकला आहे. पुरुषांच्या लेखी स्त्रीचे दुय्यमत्व अधोरेखित करताना ययाती चित्रलेखेला प्रातिव्रत्याचा उपदेश करतो, त्याद्वारे हिंदू पुरुषाची दांभिकता व दुटप्पीपणावर ते मार्मिक टिप्पणी करतात. आणि कथेची पुनर्रचना आणि पात्रांवर आधुनिक स्त्रीच्या संवेदनशीलतेचे रोपण करून 'ययाती' ला एक आधुनिक परिमाण बहाल करतात. ' येथेच हे नाटक एक वेगळी कलात्मक उंची गाठते. ययातीमध्ये देवयानी, शर्मिष्ठा व दासी असलेली स्वर्णलताच्या वाट्यासही येणारे दुय्यमत्व ते रेखाटतात, मात्र चित्रलेखा धीटपणे प्रश्न उपस्थित करतो. ती आजच्या काळाच्या संदर्भात आधुनिक नसली तरी तिला स्वत:च्या शरीराच्या भुकेची जाणीव आहे व ते व्यक्त करण्याचे धाडस पण, तरीही तिला तत्कालीन पुरुषी वर्चस्वाच्या व स्त्री पावित्र्याच्या कर्मठ व लादलेल्या नीती-नियमांपुढे हार पत्करत आत्महत्या करावी लागते. थोडक्यात एका पुराणकथेची पुर्नबांधणी व मोडतोड करीत, आपल्या प्रतिभेने त्यात भर टाकीत कार्नाड स्त्रीची व्यथा ताकदीने मांडतात. Collected plays प्रस्तावनेत अपर्णा भार्गव धारवाडकर नेमकेपणानं ही स्त्री व्यथा मांडताना म्हणतात, The most remarkable feature of yayati..... is its quartet (Devyani, Sharmishtha, Swarnalata and specially chitralekha) of sentient articulate, embittered women, all of whom are subject in varying degrees to the whims of men, but succeed in subverting the male world through and assertion of their rights and previlges.

 या नाटकाकडे देवदत्त पटनाईक ययाती गंड' Complex या नजरेतून पहातात. ययाती कॉम्पलेक्स म्हणजे बापाने मुलाकडून त्यागाची अपेक्षा स्वसुखासाठी व स्वार्थासाठी करणे होय. भीष्म व राम हे पुरूप्रमाणे या गंडाचे शिकार म्हटले पाहिजेत. ग्रीक पुराणात इडिपस कॉम्पलेक्स आहे, त्याची ही विपरीत बाजू म्हटली पाहिजे. कार्नाड या नाटकाद्वारे बापाकडून मुलाकडे मागावयाच्या त्यागाच्या नैतिक अधिकारावर प्रश्नचिन्ह लावतात. कार्नाड स्वत: या संदर्भात म्हणतात की, Old age bring no

४३४ ■ लक्षदीप