पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/429

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मध्ये अनुक्रमे ०.९१ आणि ०.९३ आहे, तर दुस-या भागातील राज्यापैकी पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेशमध्ये १.३० आहे. गुजराथ, बिहार व राजस्थानही याच भागात समाविष्ट आहेत.
 उत्तर व पश्चिम प्रांतामध्ये स्पष्टपणे स्त्रीविरुद्ध जो पक्षपात दिसून येतो, तो पूर्व व दक्षिण प्रांतात दिसून येत नाही. ह्या फरकाचे कारण अर्थातच आर्थिक असू शकत नाही. कारण शून्य ते पाच वयोगटातील मुलींचे प्रमाण प्रमाणित कसोटीपेक्षा कमी असलेल्या भारतीय प्रांतात जसे श्रीमंत प्रांत (पंजाब व हरियाना) आहेत, तसेच गरीब प्रांत (मध्य प्रदेश व उत्तरप्रदेश) आहेत. वेगाने विकसित होणारे प्रांत (महाराष्ट्र व गुजराथ) जसे आहेत, तसेच अविकसित (बिहार व उत्तरप्रदेश) प्रांत आहेत.
 थोडक्यात, निष्कर्ष काढायचा झाला तर भारताचे लिंगदराच्या संदर्भात दोन भाग झालेले आहेत. शिक्षण, आरोग्य व आर्थिक स्वावलंबन यामुळे दक्षिण राज्ये स्त्री - पुरुष जैविक समानतेच्या बाबत अग्रेसर आहेत, तर पूर्व राज्यांमध्ये मातृसत्ताक पद्धत आणि आधुनिक तंत्रज्ञान (जशी सोनोग्राफी) चा कमी प्रसार यामुळे तेथेही निरागा लिंगदर आहे. मात्र पश्चिम राज्ये - जी आर्थिक व औद्योगिक दृष्टीने प्रगत आहेत, तथ मानवी विकासाकडे पुरेसे लक्ष न दिल्यामुळे आणि उघड किंवा छुपी जमीनदारा, ' सामंतवादी विचारधारा यामुळे तेथे शून्य ते सहा वयोगटातील मुलींचे प्रमाण चिंताजनक वाटण्याइतपत कमी झाले आहे. तर उत्तर राज्यांमध्ये कमी साक्षरता, सामतवादा, धार्मिक व जातीयप्रवृत्तींचा प्रभाव यामुळे स्त्रीला दुय्यम लेखण्याची वृत्ती ही तुलनेने अधिक आहे त्याची परिणती स्त्रीचे घसरलेले प्रमाणात झाली आहे.
ताजाकलम
 हा लेख २००२ चा आहे व त्याला 'आधार २००१ च्या जनगणनेचा होता.पण आता २०११ च्या जनगणनेचे आकडे जाहीर आहेत व भारताच्या एकूण चित्रात बदल झाला नाही, उलटपक्षी परिस्थिती अधिक गंभीर व चिंतेची झाली आहे. त्यामुळे अमर्त्य सेन यांचे प्रतिपादन व कारणमीमांसा यापुढे तरी राज्यकर्ते व समाजधुरीणांनी लक्षात घेणे आवश्यक आहे, एवढे मात्र खरे!

०-०-०
४२८ ■ लक्षदीप