पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/423

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि जन्मदर विषमतेमध्ये झपाट्याने मागील काही वर्षात वाढ होताना दिसून येते.
 आरोग्य सुविधा, सकस व पुरेसा आहार आणि जगण्यासाठी लागणाच्या इतर अनुषंगिक बाबी पुरुषांच्या तुलनेत स्त्रीला कमी व असमान पद्धतीने मिळत असल्यामुळे त्यांच्या मृत्यूदर अधिक आहे, हे प्रो. सेन आकडेवारीने सप्रमाण प्रसिद्ध करतात. जगात प्रत्येक १०० पुरुषांमागे केवळ ९८ स्त्रिया आहेत. अपवाद आहे तो केवळ यरोप व उत्तर अमेरिकेचा, जिथे १०० पुरुषामागे १०५ स्त्रिया आहेत. स्त्रियांचे कमी प्रमाण व कमतरता आशिया व उत्तर आफ्रिकन देशात चिंताजनक आहे. प्रत्येक १०० पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण इजिप्त व इराण मध्ये ९७, बांगलादेश व तुर्कीमध्ये ९५,चीनमध्ये ९४ भारत व पाकिस्तानमध्ये ९३ व सौदी अरेबियामध्ये ८४ आहे. वास्तविक समान आरोग्यसुविधा व आहाराची उपलब्धता मिळाली तर स्त्रियांमधील मृत्यूचे प्रमाण प्रत्येक वयोगटासाठी पुरुषापेक्षा कमी असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. अगदी गर्भातही मिसकॅरेजचे प्रमाण स्त्रीलिंगी गर्भात, पुरुषलिंगी गर्भापेक्षा कमी असते. तरीही हा निसर्गाचा भेदभाव म्हणाला पाहिजे की, जगात सर्वत्र मुलीपेक्षा जादा मुले गर्भधारण करतात व जन्मास येतात, तरीही जसजसे वय वाढत जाते, तसतसे वाढत्या वयोगटात पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण स्त्रीपेक्षा प्रत्येक गटात जादा आहे. युरोप व अमेरिकेत स्त्रिया अधिक असल्याचे हे कारण आहे. तेथे आरोग्य सुविधा आणि आहाराच्या बाबतीत लिंगसमानता आहे, म्हणून वरील सिद्धान्ताला पुष्टी मिळेल.
 परंतु काही अपवाद वगळता, जगात बहुसंख्य देशात स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात आहार व आरोग्य सुविधा (विशेषत: मुलींना) मिळत असल्यामुळे या लिंग पक्षपातामुले स्त्रियांचा मृत्यूदर हा पुरुषांच्या मृत्यूदरापेक्षा कितीतरी जास्त आहे. यातूनच प्रो. सेन यांनी हरविलेल्या स्त्रिया (Missing Womens) ची कल्पना विकसित केली असून त्याचा उद्देश प्रत्यक्षात या देशात असलेल्या स्त्रिया व लिंग असमानता आरोग्य सुविधा व आहारात नसती तर किती स्त्रिया असू शकल्या असत्या याचा आवाका जाणून घेणे हा आहे. त्यासाठी सेन हे सबसहारन आफ्रिका (जेथे तुलनात्मकदृष्ट्या स्त्रीबाबत पक्षपात कमी प्रमाणात आहे.) जेथे स्त्री पुरुषांची टक्केवारी १.०२२ आहे, प्रमाण मानून त्या पाश्र्वभूमीवर भारताची टक्केवारी ०.९३० आहे. म्हणजेच पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी कमी आहे. १९८६ मध्ये या आधारे भारतात तीन कोटी सत्तर लाख स्त्रिया हरवलेल्या होत्या, तर चीनमध्ये चार कोटी चाळीस लाख. जगात एकूण दहा कोटी पेक्षा अधिक स्त्रिया याप्रमाणे हरवल्या गेल्या आहेत. हा मृत्यूदरातील लिंग असमानतेचा रोकडा पुरावा आहे.

 याची काय कारणे आहेत? याबाबत दोन विचारप्रवाह विद्यमान आहेत. लिंग असमानता ही थेट आर्थिक स्वातंत्र्याशी वा अधिकाराशी निगडित आहे, तर दुस-या विचारप्रवाहाप्रमाणे कुटुंबाला मुलाकडून मुलीपेक्षा अधिक आर्थिक लाभ होतो म्हणून

४२२ ■ लक्षदीप