पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मांसाहारी भोजन करीत नाहीत. मुघल बादशहा जहांगीरनं 'तख्त ई - जहांगिरी' या आत्मपर लेखात असं म्हटलं आहे, की तो जेव्हा जेव्हा काश्मीरला आला, त्याला पंडित व मुसलमान यांच्यात फरक करता आला नाही; कारण दोघांच्या जीवनशैलीत कमालीचं साम्य आहे. दोघांच्या लग्नविधीत फेरन हा पोशाख समान असतो; मेंदीची रात्र व लागते समान असतात. एवढेच नव्हे, तर त्यांची नावं पण समान आहेत. काश्मिरीतली मोख्त, झुन, रेहत, कालीज ही स्त्री नामं दोन्ही धर्मात प्रचलित आहेत. आता सुन्नी मुस्लिमांत अरबी नावांची पद्धत प्रचलित होताना दिसते, पण शिया मुस्लिमांत आजही ही नावे आढळतात. संकटसमयी दोन्ही धर्मीय बाबा ऋषीच्या दार्यात श्रद्धेनं जातात. दोघांची आजही मखदूम साहब दर्गा व हजरतवलवर श्रद्धा आहे. हीच आमची विरासत आहे. हीच आमची कश्मीरियत आहे.' अलिकडेच डॉ. मनजित सिंग यांचा 'Kashmiriyat-The pluralist Sufi - Bhakti Rishi Culture' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या प्रकाशनाच्यावेळी बोलताना डॉ. फारुख अब्दुल्लांनी काश्मिरियतची व्याख्या अशी केली आहे - 'Kashmiriyat can be defined as the principle of harmony; a principle that is the essence of pluralistic culture of jammu and kashmir and one that should become the operating principle of the rest of country (India). If India has to survive as a Modern Nation, it has to keep on reinventing the principle of harmony and balance between groups and region.' फारुक अब्दुल्लांनी त्यांच्या भाषणाद्वारे हेच अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे, की काश्मीरियतचे तत्त्वज्ञान पूर्ण भारतात पसरलं पाहिजे. हिंदू - मुस्लीम एकता व मनोमीलनाचा आधार काश्मीरियत व ऋषी - सूफी संत परंपरा होऊ शकते! | काश्मीर प्रश्नावर काश्मिरी जनतेच्या मनासारखा तोडगा काढायचा असेल तर काश्मीरियतच्या आधारे काढावा लागेल. जेव्हा त्यांना 'Kashmiriyat is a prototype of Hindustaniyat' हे पटेल, त्या दिवशी काश्मीर मनानं भारताशी एकरूप झालेला असेल. त्यासाठी राजकारणापेक्षाही संस्कृतिकरणाची कास आपणास धरावी लागेल. पहलगाम, गुलमर्ग में श्रीनगरमध्ये भटकताना हिमालयाचं अनुपमेय सौंदर्य जाणवतं व भारतीय संस्कृतीमध्ये काश्मीर किती रुजलेला आहे याची हरघडी जाणीव होते. त्यामुळे काश्मीर हिंदुस्थानपासून अलग नाही हे सतत जाणवतं. आणि इतका सुंदर प्रदेश - भूभाग भारतासाठी स्वर्गाहून कमी थोडाच आहे? तो आपण कसा सोडणार? पाकिस्तानात जाऊ देणार? भारताचे पंतप्रधान नरसिंहरावांनी म्हटल्याप्रमाणे काश्मीर प्रश्न एवढ्यापुरताच शिल्लक आहे की, पाकव्याप्त काश्मीर भारतात केव्हा व कसा येईल? आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणात पाकव्याप्त काश्मीर ४१६ । लक्षदीप