पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

fraternity and isolation has led to both pride and patriotism among Kashmiries and it has become fashionable to use kashmiriyat both as societal and political expressions." काश्मीरियत जीवनशैली विकसित होण्यामध्ये कारणीभूत ठरलेला दुसरा घटक म्हणजे तेथील संत = सूफी कवीची परंपरा व त्यांची काव्यरचना. त्यातही प्रामुख्याने प्रारंभीच्या काळात लाल देड व नुरुद्दीन यांचा काश्मिरी जनतेवर - हिंदू व मुस्लीम दोहोंवरही गाढ प्रभाव पडला आहे. प्रसिद्ध पत्रकार व लेखक एम. जे. अकबर यांनी त्यांच्या Kashmir - Behind the vale' या पुस्तकाच्या एका प्रकरणात लाल देड व नुरुद्दीनच्या सूफी संत परंपरेचे वर्णन करून त्याद्वारे काश्मीरची स्वतंत्र ओळख व हिंदू-मुस्लीम बंधुभाव कसा निर्माण झाला याचं समर्पक कथन केले आहे. लाल देड़ हीं संत कवयित्री. हिने काश्मिरी भाषेला तिची स्वतंत्र ओळख करून दिल्याचे आता सर्वसामान्य झाले आहे. मराठीसाठी जसे ज्ञानेश्वर आद्य महत्त्वाचे, तसंच काश्मिरी भाषेसाठी लाल देड किंवा लल्लेश्वरी महत्त्वाची. काश्मिरी ही संस्कृतोद्धव प्राकृत भाषा म्हणून जन्मास आली, पण तिच्यावर इराणियन व इंडोजर्मनमधल्या दार्डिक (Dardic) भाषेचा बराचसा प्रभाव आहे. मार्को पोलोने काश्मिरी भाषेचा उल्लेख केला आहे. त्यावरून तिचे प्राचीनत्व लक्षात येतं. पण ही कधीही राज्यभाषा झाली नाही हे तिचं दुर्दैव! तो आज मोठ्या प्रमाणात बोली भाषाच राहिली आहे. ही भाषा संगीताला अत्यंत अनुकूल आहे. कारण तिच्यात कठीण शब्द नाहीत. तरीही काश्मिरी माणसांनी प्रत्येक जनगणनेत आपली मातृभाषा म्हणून काश्मिरी भाषा उर्दूला बाजूस सारून नोंदली आहे. कारण ती त्यांच्यासाठी अस्मितेची बाब आहे. याला कारण आहे लाल देड व नुरुद्दिनचा जनमानसावरील काश्मिरी भाषेमार्फत पडलेला अमिट ठसा होय. जशी मराठीसाठी तुकोबाची वाणी सत्य आहे, तसंच लाल देड हिचे 'घाख' व नुरुदिनची 'श्रोक' (श्लोकाचा अपभ्रंश) मधून प्रकट केली. कविता काश्मिरी जनतेचा मानबिंदू आहे. त्यांच्या संस्कृतीची निशाणी आहे. काश्मीरियत संकल्पनेत या दोन संत कवींच्या काश्मिरी भक्तिकाव्याचा प्रभावी हिस्सा आहे. लल्लेश्वरी उर्फ लाल देड ही संत कवियित्री श्रीनगरजवळच्या छोट्या पंडरेठन या गावात ब्राह्मण कुटुंबात १४ व्या शतकात जन्मास आली. तिचा बाराव्या वर्षी विवाह झाला; पण बावळट नवरा व कजाग सासूमुळे तिचा फार छळ झाला. तिनं असा होऊन घर सोडलं. तिला तिच्या सुदैवानं शाह हमादान हे सूफी संत भेटले व तिला आत्मसाक्षात्कार झाला. शाह हमादानमुळे तिच्या काव्यावर सूफी तत्वज्ञानाचा प्रभाव जाणवतो. ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी आपल्या धर्म व तत्वज्ञानाच्या प्रचारासाठी पाली ही सामान्यजनांची भाषा वापरली, तशीच लाल देडनं काश्मिरी भाषा वापरुन ४१० । लक्षदीप