पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनेक मुसलमान राजवटी आल्या व गेल्या, त्यापैकी काहींनी, विशेषत्वाने सिकंदरने, जबरदस्तीनं धर्मप्रसार केला.
 पण त्याचा मुलगा शाहीखान उर्फ झैन-उल-अबिदिन याचा कालखंड काश्मीरच्या इतिहासात शांतता, स्थैर्य व प्रगतीचा ठरला. त्याच्यावर लाल देड व प्रामुख्याने शेख नुरुद्दिनच्या काव्य वे मानवतावादी, सहिष्णुतावादी तत्त्वज्ञानाचा गाढा प्रभाव होता. त्यामुळे त्याच्या काळात हिंदू पंडितांना समाजजीवनात मानाचे स्थान मिळाले व त्यांना धार्मिक स्वातंत्र्यही उपभोगता येऊ लागले. त्याच्यामुळे मुस्लिमांना ही जाणीव झाली, की समान सांस्कृतिक ओळख, मानवतावाद, सहअस्तित्व व उदारमतवादाच्या आधारे आपली धार्मिक ओळख जपत हिंदूशी बंधुभावानं जगता येतं, राहाता येतं. ही काश्मीरियतची सुरुवात म्हटली पाहिजे.
 त्यानंतर एका शतकानंतर मुघल सम्राट अकबरानं काश्मीर प्रदेश जिंकून आपल्या साम्राज्याला जोडला. त्यानं १५८२ मध्ये 'दिने इलाही' ची (दिव्य धर्म) स्थापना केली. त्यात हिंदू व इस्लाम धर्मातील सर्वोत्तम बाबींचा संगम साधला. त्यामुळे समाजजीवनात नैतिक व मानवतावादी मूल्य के पवित्र राहणीमानाची मूळ रुजली गेली.अकबराने मानवी मूल्यं, धार्मिक सहिष्णुता, बहुविधता व वैयक्तिक नीतिमत्तेचे नवे मानदंड प्रस्थापित केले. जेव्हा त्यानं काश्मीर जिंकले, 'दिने इलाही' च्या आधारे पुन्हा एकवार तिथे धार्मिक सद्भाव निर्माण झाला आणि काश्मीरियता बळ मिळालं.
 काश्मीरियतचे अभ्यासक विजय के, साझबाल यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर - 'Due to Zain ul - Abidian and king jalal ud Din Akbar, Kashmiriyat has ermerged as the identity of choice in kashmir. In its infancy, it was defined by three Characteristics : a benevolent and wise ruler who has a grand vision, a majority community (i.e. muslims) that willingly accommodated pluralism as socially enriching and kindness towards minorities as a worthy virtue, and a minority community (i.e. Hindu) that liveda life of dignity unknown in many parts of the world in the 16th century and even later.

 Hence, kashmiriyat came to the be characterized and expressed by religious, calturaland social harmony in a land blessed byGodas a paradise and where a confluence of Sufism. Shaivism, Buddism and sikhism in imagnificent and naturally beautiful surroundings provided an ideal sense of brotherhood resilience and interdependency to fight physical isolation as the region used to be cut off from the rest of the world for nearly six months in a year. That sense of

लक्षदीप ■ ४०९