पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनशैली आहे. ती साधारणपणे १६ व्या शतकापासून क्रमशः विकसित होत दृढमूल झालेली पाहायला मिळते. तिची वैशिष्ट्यं धार्मिक व सांस्कृतिक सामंजस्य,आपल्या हिमालयाच्या डोंगराळ व निसर्ग सुंदर प्रदेशावरची प्रखर देशभक्ती आणि अभिमान ही आहेत.
 खरं तर काश्मीर खोच्यामध्ये सांस्कृतिक, धार्मिक व प्रादेशिक विविधता आहे. इतिहासकाळात या भूभागात हिंदू शैव धर्म आणि बुद्ध धर्माचा प्रभाव होता. मध्ययुगात इस्लामचा प्रवेश झाला; पण तो तलवार गाजवणाच्या सुलतान बादशहामार्फत नाही तर सूफी संत - पीरांमार्फत प्रेम व शांतीचा संदेश घेऊन, महाराजा रणजितसिंगांनी जेव्हा काश्मीर जिकलं, तेव्हापासून, म्हणजे अठराव्या शतकापासून, इथं शीख धर्मही रुजला, थोडक्यात, काश्मीरमध्ये चारही धर्माची वस्ती आहे. हिंदूसाठी काश्मीर कश्यप ऋषींनी काश्मीरची निर्मिती केली असल्याच्या श्रद्धेमुळे, अशोक कनिष्कांपासून बौद्ध धर्माची व्यापक प्रचार झाल्यामुळे बौद्धांसाठी, झैन उल अबिदिन व अकबरामुळे आणि हजरतबल मशिदीमुळे मुस्लिमांसाठी व महाराजा रणजितसिंगमुळे ही भूमी आपली मानणाच्या शिखांमुळे, काश्मीरची धार्मिक बहुविधता सिद्ध होते, पण सहअस्तित्वाची जीवनश्रद्धा चारही धर्मात असल्यामुळे काश्मीरियतचे तत्त्वज्ञान सिद्ध झाले. कश्मीरियत म्हणजे देशभक्ती, बंधुभाव, देशीय संस्कृतीचा अभिमान आणि धार्मिक सहिष्णुता.
 "The true meaning of Kashmiriyat' या लेखात विजय के. साझबाल म्हणतात की, काश्मीरियतचा विषय निघाला की मागे पडलेल्या रम्य भूतकाळाची स्मृती जागृत होते; किंवा सरळसरळ या संकल्पनेची धज्जी उडवली जाते. तरीसुद्धा आजही जेव्हा जम्मूच्या मुठी कॅम्पमध्ये पंडित मोईनुद्दीन आग्रे या मृत्त झालेल्या मुस्लिमाचं इस्लामी परंपरेनुसार दफन करतात किंवा श्रीनगरमध्ये जेव्हा एकट्यादुकट्यानं राहणा-या पंडित किंवा पंडिताईनचे निधन होतं, तेव्हा मुस्लीम पुढे सरसावत विधिवत दहन करतात, तेव्हा त्यांच्या कृतीमधून कश्मीरियतचे संस्कार प्रकट होत असतात.
 काश्मीरियतचा विकास कसा झाला? सर्वसाधारणपणे त्याला दोन बाबी कारणीभूत ठरल्या असे अभ्यासक मानतात. पहिला घटक हा दोन मुस्लीम राज्यकर्त्यांचा उदारमतवादी राज्यकारभार होय. दुसरा घटक म्हणजे काश्मीरी भाषेत मानवतावादी तत्त्वज्ञान सांगणारे दोन संत कवी - लाल देड आणि नुरुद्दीन उर्फ नंद ऋषी - वे त्यांचं काश्मिरी भाषेतले काव्य होय.

 काश्मीरमध्ये बुलबुल शहा या तुर्कस्थानच्या मुस्लीम सूफी संताचे सहदेवा या राजाच्या कालखंडात (तेराव्या शतकात) आगमन झाले. त्यानं शांततापूर्ण रीतीने धर्म- प्रसार केला. जुलमी राजवटीला कंटाळलेल्या अनेक हिंदू व बौद्ध धर्मीयांनी सूफी संतांचा साधेपणा, मानवतावाद व पवित्र जीवनव्रताकडे आकृष्ट होऊन इस्लामचा स्वीकार केला, काश्मीरचा पहिला मुस्लीम सुलतान म्हणजे शमशुद्दीन होय. त्यानंतर

४०८ ■ लक्षदीप