पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एल. ओ. सी. (लाईन ऑफ कंट्रोल) ला मान्यता दिली.त्यानंतरच्या काश्मीर प्रश्नाचा इतिहास सर्वश्रुत आहे.
 तरीही मला काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग वाटतो, त्यामागे देशप्रम ही एकच प्रबळ भावना नाही, ती तर आहेच. पण ज्याहून जादा ‘काश्मीरियत ही संकल्पना आहे आणि ती भारतीयतेशी मिळतीजुळती अशा ‘गंगा - जमनी' संस्कृतीवर आधारित आहे. “गंगा - जमनी' संस्कृती ही नामनिर्देशक नाही, तर एकत्र येऊन जेव्हा दोन नद्यांचा संगम होतो व पुढे ती एकच नदी म्हणून वाहते, त्या संगम संस्कृतीस ‘गंगा - जमनी' संस्कृती म्हणता येईल. काश्मीरियत ही अशीच हिंदू - मुस्लीम - बौद्ध व शीख परंपरेतील सर्वमान्य तत्त्वे अंगीकारून सहअस्तित्वाची वाटचाल करताना विकसित झालेली संकल्पना आहे.
 काश्मीरमध्ये दुस-या सकाळी शंकराचार्यांचे मंदिर, मग हरी पर्वत आणि शेवटी हजरतबल या तिन्ही स्थळाचं दर्शन घेतलं. त्यावेळी मनात काश्मीरियतचे विचार तरळत होते. मला अचानक काश्मीर विद्यापीठाचे कुलगुरू व काश्मीर प्रश्नाचे अभ्यासक अमिताब मट्ट यांच्या एका लेखाचं स्मरण झालं. त्यांनी काश्मीरियतचे तत्त्वज्ञान विशद करताना लिहिलं होतं.
 "There was a time when kashmir was the perfect embodiment of the idea of India - Hindus, Mulims, Sikhs and Christians living together in relative harmony. Growing up in Kashmir was to at - once celebrate diversity and take pride in common syncretic identity of Kashmiriyat. The Lord's prayer at Burn Hall School, the azaan at Syed Sahib's dargah and the bells of Shankaracharya temple, all signified a unity of purpose beyond the superficial differences.
 ११०० फूट उंचीच्या ‘तख्त - ए - सुलेमान' डोंगरावर वसलेलं शंकाराचार्य मंदिर म्हणून आज ओळखलं जाणारं हे वास्तविक पुरातन शिवमंदिर आहे. इ. स. पूर्व ३१७ साली राज गोपदत्त यानं हे मंदिर बांधलं होतं. दहाव्या शतकात हिंदू धर्माच्या प्रचारासाठी इथं आदी शंकाराचार्य आले होते व मंदिरात काही काळ थांबले होते. तेव्हापासून हे शंकराचार्यांचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. भूकंपामुळे मंदिरास तडे गेले होते, तेव्हा ज्याच्यापासून ‘काश्मीरियत' चा प्रारंभ झाला असं स्थूलमानानं म्हणता येईल, त्या झैन उल अबिदिन या मुस्लीम राजानं त्याच्या जीर्णोद्धार केला. डोग्रा राजा गुलबसिंगांनी दगडी पाय-या बांधल्या व १९२५ साली मंदिरात प्रथम वीज आली.

 मंदिराची प्रदक्षिणा करताना चारही बाजूनं श्रीनगर शहराचे विहंगम दृश्य दिसतं. समोर पसरलेला दाल व नगिना लेक व त्यावर तरंगणाच्या शिकारा बोटी दिसतात. दूर आभाळात भिडणान्याचा व शुभ्र हिमराशी अंगाखांद्यावर बाळगणाच्या निळसर

४०३ ■ लक्षदीप