पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/398

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यांना माझ्या दहशतवादाशी संबंधित प्रश्नांची कदाचित अपेक्षा नसावी. मी त्यांना अफगाणिस्तानचे तालिबान हे देवबंदच्या प्रेरणेने काम करतात व जिहादच्या नावाखाली दहशतवाद करतात, त्याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे विचारलं. तेव्हा त्यांनी काहीसा बचावात्मक पवित्रा घेत उत्तर दिलं,
 सर, आपने यहाँ देखा है, यहाँ सिर्फ दिन की तालिम दी जाती है, हमें ये टेररिझम बिलकुल मंजूर नहीं है. इस्लाम का मतलबही शांती-अमन हैं. कुछ लोग बहक गये, कुछ बुरा काम किया तो मजहब को कैसे जिम्मेदार ये अमरिकी मानते है? वो भी निग्रोब्लॅकसे गैरबर्ताव करते है. इतका मतलब उनका देश और धरम थोडाही रेसिस्ट हो जाता है?"
 माझ्यासोबत दिल्लीपर्यंत मला निरोप देण्यासाठी व नोयडात घर असल्यामुळे निवडणुकीचा श्रमपरिहार व्हावा म्हणून, रजा घेऊन माझ्या सोबत निवडणुकीसाठी असलेले अन्सारी नावाचे पोलिस सब-इन्स्पेक्टर होते. त्यांना देवबंदला ड्यूटीमुळे येता आलं नव्हतं, पण बागवाली मदरशात ते माझ्याबरोबर होते. तेही चार वर्षे बालपणी मदरशात शिकले होते. पुढे त्यांनी सातवीला सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. हेडकॉन्स्टेबल म्हणून नोकरीस लागले व आज ते सब-इन्स्पेक्टर आहेत; पण त्यांना मदरसा शिक्षण व आधुनिक शिक्षणाच्या दुहेरी अनुभवामुळे प्रगल्भता आलेली मला जाणवली. त्यांना मी दिल्लीच्या परतीच्या प्रवासात देवबंदच्या भेटीचा अहवाल कथन करीत हा मनातला प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी फार मार्मिक उत्तर दिलं.
 “सर, देवबंदला व यु. पी. मध्ये मदरशांमध्ये केवळ धार्मिकच शिक्षण दिलं जातं. दहशतवादाचं शिक्षण दिले जात नाही, हे मी पोलीस अधिकारी म्हणून ठामपणे सांगेन. पण जिहाद हा आत्म्याच्या शुद्धीसाठी असतो. मानवी विकासांवर मात करीत त्याला जिंकावं लागतं. त्यासाठी साधं, पवित्र - आजच्या आधुनिक जगाच्या तुलनेत मिळमिळीत - जीवन जगणं सुद्धा क्षणभंगुर आहे, आखिर पारलौकिक जीवन असीम आहे. तेथे सर्व आनंद आहे, हे मनात खोलवर बिंबवलं जातं आणि मानवी जीवनाकडे तुच्छतेनं वा उदासीनतेनं पहाणाच्या मुस्लीम मनात हे बहकलेले दहशतवादी दहशतवादाचे बीजारोपण करतात. त्यांचे प्रतिपादन साधं, सरळपणे प्रभावी असतं. “हमें वो जन्नतकी जिंदगी चाहिये, यहाँ क्या पडा है? इस जिंदगीमें हमें जिहाद करना है, वो भी इस्लामके दुश्मन के साथ, ये होली वॉर है. इसमे मारना और मरना दोनो जायज है. जिहादमें मरना शहीदी मौत के समान है, जो हमे जन्नतमें ले जायेगी." हे तत्त्वज्ञान प्राणघातक फिदाईन हमल्यामागचं आहे, असं माझं मत आहे.”

 माझ्या आगामी काश्मीरविषयक प्रश्नावरील कादंबरीसाठी मी बरंचसं संशोधन व अभ्यास करीत आहे. त्यामध्ये मला आत्मघातकी हल्ले - ‘फिदाईन हमल्यानं' चांगलंच बुचकळ्यात टाकलं होतं. जेव्हा माणसं जिवावर उदार होऊन निर्भीडपणे

लक्षदीप ■ ३९७