पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवी जीवनातला आनंद, करुणा आणि सहानुभूती या उच्चतर भावना आणि नैतिकतेच्या प्रखर संकल्पना, असा माझ्या लेखानाचा वर्षभराचा परीघ राहिला.पुस्तके, गाणी, कविता, साहित्य, निसर्ग आणि माणसं हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला. ज्यानं आपणास मनस्वी आनंद मिळाला तो वाचकांपर्यंत पोहोचवावा हा त्या मागचा उद्देश होता. तो कितपत सफल झाला हे वाचकांनी ठरवायचं आहे.
 वरील गीताप्रमाणे मलाही सुंदरतेचं वेड आहे - आकर्षण आहे. त्यामध्ये नवरस, निसर्गाचा साक्षात्कार आणि गीत - संगीताचा समावेश आहे. एखादं अति- दु:खी गीतही वेगळ्या अर्थानं तरल, भावुक करतं. मन अधिक मानवी बनवतं. दु:खाची नशा चढवणारी गीतं, पुस्तकं व कथा-कविता त्यामुळेच मला मनस्वी भावतात.
 निसर्गाची मी अनेक सुंदर रूपं पाहिली आहेत. दिवेआगरचा किंवा टायगर हिलचा सर्योदय, नायगराची ‘व्हाईस ऑफ दि गॉड' असलेली अनादी अनंत स्वरूपाची गाज किंवा पूर्ण भरलेला जायकवाडीचा विस्तीर्ण जलाशय....
 एक दृश्य मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही अमेरिका प्रवासात लॉस एंजेलसहन लॉस वेगासला रात्री बसनं जात होतो. आत उबदार सुखद उष्णता होती. बाहेर संथपणे हिमवर्षा होत होती. दोन्ही बाजू पूर्णपणे शुभ्र बर्फानं झाकलेल्या. रात्रीचा निळा प्रकाश त्यावर पडून एक वेगळीच अपौरुषेय सौंदर्याची अनुभूती देत होता. मधून मधून गाव आलं की पथदिव्यामध्ये विविधरंगी रूपं ती शुभ्र हिमांकित धरा आम्हास दाखवत होती. जवळपास पाच तासाचा हा प्रवास एक अद्भुत नितांतरम्य सौंदर्याची अनभती देणारा होता. त्यामुळे मिळालेल्या आनंदाची मोजदाद कशी करायची? पुन्हा पुन्हा त्याच्या स्मृती मनात जागृत करीत पुन:प्रत्ययाचा आनंद लुटायचा. बस्.
 गीत-संगीत व साहित्य हे तर माझे पंचप्राणच आहेत. माझे जीवनातले सुखद श्रण यामळे अधिक समृद्ध बनले. तर दु:खाचे सावट वाचनानंदात, संगीताच्या सुरावटीत वितळून गेले. हा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे. पुन्हा एकाच जीवनात अनेक जीवनांचा अनुभव वाचताना आपण त्या नायकाच्या जागी स्वत:ला कल्पन त्याच्या जीवनातल्या अद्भुत, धाडसी व रोमहर्षक प्रसंगाशी समरस झालो की येतो, आणि साफल्याचे क्षण सापडतात! नीरस जीवनही टवटवीत बनतं.
 म्हणन रवींद्र जैन म्हणतात ते खरं आहे, मलाही शब्दश: लागू आहे. मी प्रत्येक सुंदर बाबींचा चाहता आहे. त्यासाठी लुब्ध होणारा आहे. मी खरोखर फुलांचा (निसर्गाचा), गीतांचा आणि रसवैविध्याचा बीमार नाही, (कारण हा शब्द मला थोडासा खटकतो) तर शौकिन आहे, चांगल्या अर्थानं व्यसनी आहे. हे गीत मी जीवनाकडे कशा त-हेने पाहातो याचं सुरेख प्रतीक आहे.

 गदिमा, दुष्यंतकुमार, फैज अहमद फैज, शेलेंद्र आणि साहिर हे माझे गीत-

लक्षदीप ।■ ३८५