पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करणाच्या कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असताना कशी वागेल? तिने राज्यात व सोनपतला जे वातावरण पाहिले आहे, स्त्री आहे म्हणून गर्भपात झालेले पाहिले आहेत, अशी मोनिका त्याच्या प्रतिबंधासाठी काही उपाययोजना करणार नाही का?
 या सर्वांकडून मला आशा वाटते. त्यांच्या माध्यमातून देशापुढील व प्रशासनापुढील प्रश्नांचे निराकरण होण्यास नक्कीच सक्रिय व मोठा हातभार लागेल.
 मी या तरुणांकडून फार मोठी अपेक्षा तर करीत नाही ना? नक्कीच नाही. मी काही उदाहरणे पाहिली, ऐकली आहेत. आज कोकण महसूल विभागाचे आयुक्त असलेले एस. एस. संधू महिला व अल्पसंख्याकांच्या प्रश्नाबाबत किती दक्ष असतात हे मी स्वत: त्यांच्याबरोबर काम करताना अनुभवले आहे. दोन वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणून धुळ्याला काम करताना शैला ए. यांनी शिक्षणातील गुणवत्तेसाठी मनापासून काम केल्याचे मला माहीत आहे. हे दोन्ही अधिकारी ग्रामीण भारतातले - एक पंजाबचे तर दुसरी केरळची. त्यांची नाळ ग्रामीण प्रश्नांशी सहजतेने जुळून येते.
 फार दूर कशाला, महाराष्ट्राच्या असंख्य अधिका-यांनी ज्यांच्यापासून स्फूर्ती घेत प्रशासनाची वाट चोखाळली, ते सध्याचे मालदीवचे उच्चायुक्त व भारतीय विदेश सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे हे अब्दुललाट (जिल्हा कोल्हापूर) या छोट्या गावचे, गरीब घरातले. त्यांच्या उच्च पदाकडचा रोमहर्षक प्रवास त्यांनी ‘आकाश, पंख आणि माती' या आत्मचरित्रात रेखाटला आहे. ते आज मालदीवला जे करीत आहेत त्याला तोड नाही. त्याखेरीज गावासाठी पण ते आत्मीयतेने काम करतात.
 संधू, शैला आणि ज्ञानेश्वर मुळे ते तिघेही आपली ग्रामीण भागाची व गरिबीचा नाळ विसरलेले नाहीत. त्यांचा जनसेवेचा निर्धार प्रशासकीय सत्ता व संपन्न आयुष्यातही कमी झालेला नाही. मी सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांतील या वर्षी उत्तीर्ण झालेले व होऊ घातलेले प्रशासकीय अधिकारी पण संधू - शैला - ज्ञानेश्वराचीच वाट चोखाळतील व गरिबांचा आवाज व आधार होतील!
 कोणत्याही देशाच्या प्रशासकीय सुधारणेची आद्य अट असते, त्यांची प्रशासन सेवा ही बहजिनसी किंवा 'ऑल इन्क्लूजिव सर्वसमावेशक असते. समजा, अमेरिकन प्रशासनात काळे अधिकारी नसतील तर नीग्रोंच्या समस्या कशा सुटतील? भारतातही दलित - ग्रामीण, बहुजन समाजाचे नानाविध प्रश्न व समस्या आहेत. इतर उच्चवणाय अधिकारी ते सोडवणार नाहीत असे नाही. पण त्यांच्यातील अधिकारी अधिक सखोलतेने, संवेदनशीलतेने व पोटतिडकीने ते सोडवू शकतील. झालेल्या व होऊ घातलेल्या प्रशासकीय सुधारणा ख-या अर्थाने हे ध्येयप्रेरित व गरिबांचे सच्चे हमदर्द प्रतिनिधी असलेले तरुणच अंमलात आणू शकतील!

 वाराणसीचा नारायणप्रसाद जयस्वाल याचाही जीवनप्रवास त्याच्या रिक्षा ओढणाऱ्या

लक्षदीप ■ ३७५