पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/373

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हार न मानता बुद्धिमत्ता, कठोर परिश्रम व असीम ध्येयवादाच्या जोरावर प्रशासनातील मोठी पदे केवळ गुणवत्तेच्या आणि अर्थातच आरक्षणाच्या बळावर पादाक्रांत करायला सुरुवात केली. त्याला मोठी गती मिळाली ती एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून.
 नव्वदचे दशक हे मंडल कमिशनच्या शिफारसी लागू करून ओबीसींना आरक्षण दिल्याचे व आर्थिक उदारीकरणाचे होते. त्यामुळे प्रशासकीय सेवेच्या संदर्भात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे ओबीसींचा प्रशासनातला टक्का वाढत गेला. आर्थिक उदारीकरणामुळे उच्चवर्णीय तरुण वर्ग आय.टी. व एम.एन.सी.कडे वळला, परदेशी चालता होऊ लागला. (अर्थात तो आता परततोय व पुन्हा नव्या उमेदीने प्रशासकीय सेवेकडे एक आव्हान समजून येतोय.) यामुळे भारतीय प्रशासनाचा चेहरा व अंतरंग दोन्ही बदलायला सुरुवात झाली. आजही आय.ए.एस. व आय.पी.एस.चे आकर्षण मानाचे व प्रतिष्ठेचे पद मिळणाच्या सुविधा आणि ‘जॉब सिक्युरिटी'मुळे नक्कीच आहे. पण त्याचबरोबर देश व समाज घडविण्याचे आव्हान (Challenge of Nation and Society Building) आणि आपल्या मागच्या पिढीची व समाजाची उच्चपदस्थ अधिका-यांकडून जी अडवणूक व छळ, त्रास झाला, तो कमी व्हावा; त्या वंचित, उपेक्षित व पददलित समाजाचे आपण जे देणे लागतो ते त्यांच्यासाठी प्राअॅक्टिव्हली काम करून फेडावे व समाज सुधारावा म्हणून हे नवे अधिकारी प्रेरित होऊन प्रशासनात आले आहेत, येत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अंमलबजावणी केंद्रबिंदू हा उपेक्षित समाजाच्या कल्याणाकडे सरकला तर नवल नाही.
 शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचा कृष्णात शामराव पाटील याचा यूपीएससीचा निकाल जाहीर होताच गावाने त्याचे जंगी स्वागत केले. तेव्हा त मनापासून म्हणाला, “मी जे केलं ते आईच्या कष्टातून. आम्हाला घरची थोडी आणि आजोळाकडून मिळालेली थोडी जमीन, पण आजोळच्या जमिनीतून निर्माण झालेल्या वादाने अनेक मार्ग दाखवले. न्यायालयात आईने घातलेले खेटे, तहसीलदाराच्या मनधरण्या, वकिलांच्या घराचा रस्ता हे पाहता मीही मोठा सनदी अधिकार होणार आणि ग्रामीण जनतेचा आवाज होणार हे पक्के ठरवले होते. परिस्थितीशी दोन हात करीत मी वाढलो. आज ग्रामीण भागातील अनेकांना उच्च पदावर जायचे आहे, पण मार्ग दिसत नाही. त्यांचा मी वाटाड्या होणार आहे.”

 मी ग्रामीण जनतेचा आवाज (आणि आधारही) होणार या कृष्णात पाटीलच्या भावनेत बदलणाच्या भारतीय प्रशासनाचे भविष्य दडले आहे. आज सामान्य नागरिकांचा शेती, सिंचन, शासकीय कार्यालयातील विविध कामे व नागरी परवाने, कर यासाठी तलाठी ते जिल्हाधिकारी, ग्रामसेवक ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्वच्छता / कर निरीक्षक यांसारखे कर्मचारी ते मनपा आयुक्त अशा विविध शासकीय अधिकारी व कर्मचा-यांशी नित्य संबंध येतो, तेथे नागरिकांना भ्रष्टाचार,

लक्षदीप ■ ३७३