पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/369

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

transformation in the composition of the services, a transformation, though painful, which has brought up people much more representative of diverstities in our society'
 भारतीय नोकरशाहीने या साठ वर्षांत भारताच्या प्रगतीमध्ये भरीव योगदान दिले आहे. ती अकार्यक्षम असती तर आजची ही प्रगती झालीच नसती, कारण ‘डिलिव्हरी सिस्टिम' ही ब्यूरॉक्रसीच आहे. एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे - कर्नाटकमध्ये कुणालाही कोणत्याही गावचा सातबारा कुठूनही 'भूमी' योजनेअंतर्गत संगणकावर तत्काळ मिळू शकतो. त्याचे श्रेय चावला नामक एका आय.ए.एस. ऑफिसरचे आहे.
५. हिरवी हॅट काय सांगते?
 देश, राज्य, जिल्हा व ग्राम प्रशासन हे मानवाच्या प्रगती व विकासासाठी करायचे असते, याचे भान ठेवीत काम करताना प्रशासनात ‘क्रिएटिव्हिटी'ला भरपूर वाव आहे. अनेक प्रशासकांनी “आऊट ऑफ बॉक्स’ विचार करीत अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. १९८० च्या दशकात साता-याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व्ही. पी. राजा व नगरचे जिल्हाधिकारी अनिलकुमार लखिना यांनी अडगळीत पडलेला “अँडरसन मॅन्युअल' बाहेर काढला आणि कार्यालयाची पुनर्रचना केली, त्यामुळे प्रशासनात गतिमानता आली. टी. एन. शेषन यांनी ‘आचारसंहिता’ निर्माण करून निवडणूक प्रक्रिया बरीचशी शुद्ध व नियंत्रित करायचा प्रयत्न केला. मी स्वत: अकोल्यास आयुक्त असताना बीओटी तत्त्वावर सिटी बस सेवा - तीही मनपाला एक पैशाचा तोटा होणार नाही अशा पद्धतीने - सुरू केली. प्रशासकांना बरेच अधिकार असतात व चौकटीच्या आत बरीच लवचीकता असते. ती जाणून खूप काही घडविता येते!
 पण हिरव्या हॅटला याचे दुःख आहे की, अनेक प्रशासक अशी क्रिएटिव्हिटी दाखवत नाहीत, जोपासत नाहीत. त्यामुळे त्यांना याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण आवश्यक आहे.
 सार्वजनिक धोरण (public policy) हे राज्यकर्ते आखतात, त्या आखणति वरिष्ठ प्रशासक भरीव योगदान देतात, पण कधी नाव होत नाही. महाराष्ट्र शासनान अर्थसंकल्पात ‘मानवी विकास निर्देशांकावर भर दिला आहे, त्यासाठी अनेक धारण आखली आहेत. त्यात अर्थमंत्र्यांची दूरदृष्टी व ‘व्हिजन' असले तरी धोरणे आखताना अनेक सचिवांनी मदत केली आहे. ही प्रशासनातली अत्युच्च दर्जाची क्रिएटिव्हिटा - सृजनशीलता - आहे.

 किरण बेदींचे उदाहरण देऊन हिरव्या हॅटला प्रशासनाबद्दल काय वाटते हे स्पष्ट करता येईल. जेव्हा त्यांना तिहार जेलचा कार्यभार दिला, तेव्हा सा-यांना वाटले की, शासनाने त्यांना कुजवले. पण किरण बेदींनी याही संधीचे सोने केले. तुरुंग प्रशासनात

लक्षदीप ■ ३६९